Aniket Oval Memorial Committee : “हुतात्मा अनिकेत ओव्हाळ स्मृती समितीच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांना सक्षम करणे ही काळाची गरज” — देवदत्त जोशी
20-Nov-2025
Total Views |
मुंबई : (Aniket Oval Memorial Committee) अनिकेत ओव्हाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यरत असलेल्या अनिकेत ओव्हाळ स्मृती समितीतर्फे (Aniket Oval Memorial Committee) होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी मदत प्रदान करण्याचा वार्षिक कार्यक्रम स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चेंबूर येथे पार पडला.(Aniket Oval Memorial Committee)
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंगठन मंत्री देवदत्त जोशी म्हणाले की, “समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती (Aniket Oval Memorial Committee) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातत्याने पुढे येत आहे. समाजावरचं देणं फेडणं हे महत्त्वाचं कार्य असून, मुंबईसारख्या महानगरात विद्यार्थी परिषदेच्या कामात अनिकेत ओव्हाळ स्मृती समितीची जाणवणारी उपस्थिती उल्लेखनीय आहे.” अनिकेत ओव्हाळ यांच्या स्मृती (Aniket Oval Memorial Committee) निमित्ताने विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून चालणाऱ्या या कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी समिती (Aniket Oval Memorial Committee) करत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करत दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे समितीस दरवर्षी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात मी स्वतः अनेक वर्षं सक्रिय होतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार हे अनेक योजनांद्वारे समाजातून नवउद्योजक घडवत आहे याचा अनुसूचित समाजातील अधिकाधिक तरुणांनी या संधींचा लाभ घ्यावा.”असे आवाहन त्यांनी केले.(Aniket Oval Memorial Committee)
समितीच्या उपाध्यक्षा जयश्री ओव्हाळ यांनी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “अनिकेतसारखा मुलगा राष्ट्रवादी विचारातून समाजासाठी कार्यरत होता. तो आज नसला तरी समितीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडत असून, हेच अनिकेत माझ्यासोबत असल्याचे समाधान देणारे आहे. ”विद्यार्थ्यांनी संघर्षातून यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.(Aniket Oval Memorial Committee)
कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष राज कांबळे यांनी मांडली. मान्यवरांचा परिचय संस्थेचे सचिव डॉ. कैलास सोनमनकर यांनी केला. सूत्रसंचालन ॲड. कृष्णा दुबे यांनी केले. समितीतर्फे (Aniket Oval Memorial Committee) नागरिकांनी पुढील उपक्रमांना सहकार्य करत विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी साथ देण्याचे आवाहन करण्यात आले.(Aniket Oval Memorial Committee)