मुंबई : (Bihar CM Nitish Kumar) बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर, गुरुवारी दि. २० नोव्हेंबर रोजी पाटण्यातील गांधी मैदानावर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यात नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, त्यांच्यासोबत भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
यासोबतच नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळातील एकूण २६ मंत्र्यांना राज्यपालांनी गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप/NDA शासित ११ राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
नवीन मंत्र्यांची संपूर्ण यादी
१) सम्राट चौधरी (उपमुख्यमंत्री)
२) विजय कुमार सिन्हा (उपमुख्यमंत्री)
३) विजय कुमार चौधरी
४) बिजेंद्र प्रसाद यादव
५) श्रवण कुमार
६) मंगल पांडेय
७) डॉ. दिलीप जायसवाल
८) अशोक चौधरी
९) लेसी सिंह
१०) मदन सहनी
११) नितिन नवीन
१२) रामकृपाल यादव
१३) संतोष कुमार सुमन
१४) सुनील कुमार
१५) मोहम्मद जमा खान
१६) संजय सिंह टायगर
१७) अरुण शंकर प्रसाद
१८) सुरेंद्र मेहता
१९) नारायण प्रसाद
२०) रमा निषाद
२१) लखेंद्र कुमार रोशन
२२) श्रेयसी सिंह
२३) डॉ. प्रमोद कुमार
२४) संजय कुमार
२५) संजय कुमार सिंह