मुंबई : (Konkan Railway) कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) प्रमुख स्थानकात आणि कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ‘५ जी’ नेटवर्क सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून प्रवाशांना विनाव्यत्यय इंटरनेटचा वापर करता येईल. कोकण रेल्वे (Konkan Railway) कॉर्पोरेशन लिमिटेडने ब्लू क्लाउड सॉफ्टटेक सोल्युशन्स लिमिटेडसोबत प्रमुख स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी आणि डिजिटल मनोरंजन सेवांसाठी नुकताच नवी मुंबई येथे सामंजस्य करार केला. कोकण रेल्वेच्या मडगाव, रत्नागिरी, उडुपी या तीन रेल्वे स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी करण्यात येईल. (Konkan Railway)
तर, टप्प्याटप्प्याने ब्लू क्लाउड इतर रेल्वे स्थानकांमध्ये त्यांची डिजिटल उत्पादने आणि ‘५ जी’ फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस सेवा पुरवेल. प्रवाशांना उपलब्ध असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल. यासह कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ही सेवा पुरवेल. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही अडचणी विना इंटरनेटद्वारे माहिती मिळविता येईल. (Konkan Railway)
ब्लू क्लाउड सॉफ्ट टेक सोल्युशन्स लिमिटेड सोबत ही भागीदारी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा प्रदान करण्याच्या वचनबद्धतेशी पूर्णपणे सुसंगत आहे. प्रमुख स्थानकांवर नाविन्यपूर्ण ‘५ जी’ नेटवर्क आणि डिजिटल मनोरंजन उपलब्ध करून दिल्याने, कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) आधुनिकीकरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले. (Konkan Railway)
कोकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासन प्रवाशांच्या सोयी वाढविण्यासाठी, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि देशाच्या डिजिटल प्रगती आणि गतिशीलता उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी रेल्वे मार्गात अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मत कोकण रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी व्यक्त केले. (Konkan Railway)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.