Prohibited Substances : प्रतिबंधित पदार्थ वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; मंत्री नरहरी झिरवाळ

    19-Nov-2025   
Total Views |
Prohibited Substances
 
मुंबई : (Prohibited Substances) आरोग्याला घातक असलेल्या प्रतिबंधित पदार्थांचा वापर (Prohibited Substances) आणि अशा पदार्थांची विक्री रोखण्यासाठी सतर्क रहावे, तसेच असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.(Prohibited Substances)
 
मंगळवारी मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक पार पडली. (Prohibited Substances) यावेळी आयुक्त श्रीधर डुबे पाटील, सहआयुक्त (दक्षता) डॉ.राहुल खाडे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने उपस्थित होते. मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, "प्रतिबंधित (Prohibited Substances) असलेल्या गुटखा आणि तत्सम पदार्थांची विक्री शाळा अथवा कोणत्याही परिसरात होणार नाही याची दक्षता संबंधित कार्यक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. या दृष्टीने वेळोवेळी काटेकोर अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकारी यासंदर्भात अक्षम ठरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असे त्यांनी सांगितले.(Prohibited Substances)
 
हेही वाचा : Tuljapur Drugs Case : आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे खा. सुप्रिया सुळे यांना पत्र   
 
उपहारगृह-हॉटेलच्या ठिकाणी स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी अभियान
 
"नागरिकांना स्वच्छ आणि सकस आहार मिळावा तसेच उपहारगृह आणि हॉटेलच्या ठिकाणी अधिक चांगले वातावरण राहावे, यादृष्टीने लवकरच राज्यात अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये चांगले काम करणाऱ्यांना गौरवण्यात येईल. यासाठी शहरांसह ग्रामीण भागात तालुकास्तरावर देखील नियोजन केले जावे. या दृष्टीने विभागाने कार्यवाही करावी," असे निर्देशही मंत्री झिरवाळ यांनी दिले.(Prohibited Substances)
 
कृत्रिमरित्या फळे पिकविण्यावर निर्बंध
 
कृत्रिमरित्या फळे आणि भाज्या पिकविण्यासाठी नियमबाह्य पद्धतींचा वापर होऊ नये यासाठी तपासणी करण्यात यावी. तसेच अवैध प्रकारांवर कारवाई करावी, असे निर्देश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.(Prohibited Substances) यासंदर्भात सहकार व पणन विभागाच्या अखत्यारीतील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या फळ व्यापाऱ्यांना फळे पिकविण्याच्या शास्त्रीय पद्धतींबाबत कार्यशाळांद्वारे मार्गदर्शन व जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बेकायदेशीर रसायने किंवा गॅस वापरून फळे कृत्रिमरीत्या पिकविण्याचे प्रकार आढळल्यास अन्न सुरक्षा मानके कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.(Prohibited Substances)
  

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....