Tuljapur Drugs Case : आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे खा. सुप्रिया सुळे यांना पत्र

    19-Nov-2025   
Total Views |
 
Tuljapur Drugs Case
 
मुंबई : (Tuljapur Drugs Case) धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण (Tuljapur Drugs Case) आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांच्या भाजप प्रवेशावरून खा. सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. यावर आता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहित रोखठोक उत्तर दिले आहे.(Tuljapur Drugs Case)
राणा जगजितसिंह पाटील आपल्या पत्रात म्हणाले की, "काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहिरपणे सलग वक्तव्ये करीत आहात. तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.(Tuljapur Drugs Case) हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते, हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. त्यांच्यावर ड्रग्जप्रकरणी (Tuljapur Drugs Case) आरोप झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही काढून टाकण्यात आले नव्हते. ते ही योग्यच होते, कारण वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेल्या संविधानातील तरतुदीनुसार, जोवर एखादा दोष सिद्ध होत नाही, तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानले जाते. त्यामुळेच तर आपल्या सहकारी असलेल्या राज्यातील मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप असतानादेखील आपण त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले होते."(Tuljapur Drugs Case)
 
हेही वाचा : Anmol Bishnoi Deportation : कुख्यात गुंड अनमोल बिश्नोईचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, NIA कडून दिल्ली विमानतळावर अटक
 
‘मीडिया ट्रायल’ करण्यासाठी जाणीवपूर्वक वक्तव्य
 
"आपण स्वतः एवढ्या जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोलले गेले, ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची (Tuljapur Drugs Case) जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणारे आहे. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत (Tuljapur Drugs Case) आपण सलग दोनवेळा जे वक्तव्य केले , त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घ्यायला हवी होती. नाहीतर ही वक्तव्ये राजकारण्याने प्रेरित ‘मीडिया ट्रायल’ करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात असल्याचे स्पष्ट होते," असे ते म्हणाले.(Tuljapur Drugs Case)
 
"विधानसभा निवडणुकीच्या काळात तुळजापूर (Tuljapur Drugs Case) शहरातील स्थानिक माता-भगिनींनी शहरात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराची माहिती मला दिली. त्याचवेळी हे सगळे उध्वस्त करून टाकण्याचा शब्द मी त्यांना दिला होता. त्यानुसार मी खोलात जाऊन याबाबत माहिती मिळविली. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मी स्वतः iMesssage करून याबाबतची माहिती पुरवली आणि पाठपुरावा केला. तसेच, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यासाठी विनोद गंगने यांना जोडून दिले. या व्यक्तीने हे सगळे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. दुर्देवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच यात आरोपी बनविले. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करताना या बाबी आवर्जून नमूद केल्या आहेत. कोण खरे गुन्हेगार आहेत? हे अंतिमतः न्यायालय ठरवेलच," असेही ते म्हणाले.(Tuljapur Drugs Case)
 
हे वाचलंत का? : Dr. Mohanji Bhagwat : भारतावर प्रेम करणारा, भारतीय असल्याचा अभिमान बाळगणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू
 
अंजली दमानिया यांना उत्तर
 
"अंजलीताई दमानिया यांनी उपस्थित केलेल्या मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत तेरणा ट्रस्टने केवळ सहभाग घेतला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र कोणीही सहभागी झाले नाही. तिसऱ्यांदा निविदा निघाल्यानंतर तेरणा ट्रस्टने त्यात सहभाग घेतला. यात नेमके चुकीचे काय झाले आहे? जरा आपण सांगू शकलात, तर बरे होईल. म्हणजे आपले नेमके म्हणणे काय हे कळेल. आपल्या अजूनही काही शंका असतील, तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यासबोत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी आहे," असेही आ. राणाजगजितसिंह पाटील आपल्या पत्रात म्हणाले.(Tuljapur Drugs Case)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....