Kurla Vidyavihar Fire Incident : कुर्ला - विद्याविहारमध्ये आग !
- जीवितहानी नाही
19-Nov-2025
Total Views |
मुंबई : (Kurla Vidyavihar Fire Incident) कुर्ला आणि विद्याविहार परिसरात बुधवारी दुपारनंतर लागलेल्या आगीवर (Kurla Vidyavihar Fire Incident) महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ नियंत्रण मिळवत मोठी दुर्घटना टळली. दोन्ही घटनांत जीवितहानी झाली नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.(Kurla Vidyavihar Fire Incident)
कुर्ला (पश्चिम) येथील विनोबा भावे नगरातील मुबारेक इमारतीच्या तळमजल्यावर दुपारी गॅस पाईपलाइन गळती झाल्याने आग लागली.(Kurla Vidyavihar Fire Incident) घटना दुपारी दीड वाजता घडली. तातडीने अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले. व सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या ठिकाणी कोणतीही जखमींची नोंद झालेली नाही.(Kurla Vidyavihar Fire Incident)
विद्याविहार (पश्चिम) येथील पीटर परेरा रोडवरील कोहिनूर सिटी इमारतीत घडली.(Kurla Vidyavihar Fire Incident) सात मजल्याच्या इमारतीत सातव्या मजल्यावर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली.(Kurla Vidyavihar Fire Incident) महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी महापालिकेचे अग्निशमन दल, पोलिस तैनात झाले. पावणे सहा ते सहाच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. (Kurla Vidyavihar Fire Incident)