UBT : काँग्रेसच्या दारात उबाठा कुबड्यांसाठी कटोरा घेऊन उभी; मंत्री आशिष शेलार यांचे टीकास्त्र

    18-Nov-2025   
Total Views |
UBT
 
मुंबई : (UBT) काँग्रेसच्या दारात उबाठा (UBT) कुबड्यांसाठी कटोरा घेऊन उभी आहे, अशी घणाघाती टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
 
मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना (उबाठा) (UBT) पक्षाच्या सामना या मुखपत्रात काँग्रेसने जरा सबुरीने घ्यावे, असा सल्ला देणारा अग्रलेख लिहिण्यात आला. याबद्दल मंत्री आशिष शेलार यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत उबाठा (UBT) गटाला टोला लगावला. ते म्हणाले की, "नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा, ही म्हण महाराष्ट्राला आज सामनाचा अग्रलेख वाचताना आठवली असेल. अंगात नाही बळ तरी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आणि तथाकथित मर्दांच्या पायाखालची जमीन घसरली. लगेच अग्रलेख लिहून काँग्रेसची मनधरणी करु लागल्याचे चित्र आज महाराष्ट्राने पाहिले. ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाच्या छाताडावर गोळ्या झाडल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला सदैव लाथ मारली, त्या काँग्रेससमोर आज उबाठा (UBT) सेना कुबड्यांसाठी कटोरा घेऊन उभी आहे."
 
हेही वाचा : MahaMTB-Mumbai Dialogue: मूळ हेतू स्वच्छ नसल्यानेच मुंबईचा विकास थांबला,'रिमोट कंट्रोल'मुळे होणारे निधीचे लिकेज रोखणार
 
मराठी माणसाच्या मारेकऱ्यांच्या कुबड्या हव्यात?
 
"कुबड्यांशिवाय हे लढू शकत नाहीत. यांना मराठी माणसाच्या मारेकऱ्यांच्या कुबड्या हव्यात? तथाकथित मर्दांची काय ही अवस्था? आपल्याच अग्रलेखात काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अवसान घात केला असेही म्हणतात आणि पुन्हा मुंबईत युती करा अशी केविलवाणी विनवणी पण करतात.(UBT) वर्षानुवर्षे दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन निवडून यायचे. सत्तेच्या खुर्चीत बसायचे. मग उगाच मर्दांची भाषा करायची. फुशारक्या मारायच्या. खिशात राजीनामा घेऊन फिरायचे. याला नाव ठेव, त्याला टोमणे मार, आपल्याच मित्र पक्षाच्या आनंदात विरजण घालायचे.(UBT) दुसऱ्याच्या घरात वाकून वाकून बघून भाषणे करायची. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गाडलेल्या खानांची थडगी उकरून काढायची, औरंगजेब फॅन क्लब चालवायचा. यापेक्षा यांचा अजेंडा काय?" असा सवाल त्यांनी केला.(UBT)
 
...म्हणून उबाठा काँग्रेसच्या दारात पदर पसरुन उभी
 
"काँग्रेसने वेगळे दुकान थाटले तर बहुतेक 'औरंगजेब फॅन क्लब'मध्ये दुही माजेल ही भिती वाटते म्हणून उबाठा आता काँग्रेसच्या दारात पदर पसरुन उभी आहे. आम्हाला औरंगजेब फॅन क्लबपासून तोडू नका असा आर्जव करतेय. एमएमसी काँग्रेस म्हणजे मुस्लिम लिग, माओवादी अजेंड्यामध्ये आम्हालाही घ्या, दूर ढकलू नका, असे उबाठा (UBT) सेना काँग्रेसला सांगतेय. अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाला संताप यावा असा हा क्षण आहे," असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.(UBT)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....