MahaMTB-Mumbai Dialogue: मूळ हेतू स्वच्छ नसल्यानेच मुंबईचा विकास थांबला,'रिमोट कंट्रोल'मुळे होणारे निधीचे लिकेज रोखणार

    18-Nov-2025   
Total Views |

MahaMTB-Mumbai Dialogue
 

मुंबई : (MahaMTB-Mumbai Dialogue) कुठल्याही कामाचा हेतू चांगला असेल तर सुसूत्रता आणता येते. संबंधित पदावर बसलेल्या व्यक्तीचा हेतू काय आहे? हे महत्वाचे आहे. आतापर्यंत असलेली ही प्रामाणिकतेची उणीव आपल्याला पुढच्या काळात भरून काढायची आहे. आतापर्यंत 'रिमोट कंट्रोल'मुळे होणारे निधीचे लिकेज आम्ही रोखणार, अशी ग्वाही भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम यांनी दै. मुंबई तरुण भारत आयोजित 'महाएमटीबी-मुंबई डायलॉग' या विशेष कार्यक्रमात दिली.(MahaMTB-Mumbai Dialogue)
 
परळच्या 'आयटीसी ग्रँड सेंट्रल', मुंबई (MahaMTB-Mumbai Dialogue) येथे हा कार्यक्रम पार पडला. मुंबई शहराचा जिव्हाळ्याने विचार करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वैचारिक मंथनाच्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका, गीतकार-संगीतकार वैशाली सामंत, ‘कॅमलिन कोकायू’चे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, ‘कालनिर्णय’च्या कार्यकारी संचालक शक्ती साळगावकर, ‘शिल्प असोसिएट्स’चे सीईओ निखील दिक्षित, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी, ‘एबीपी माझा’च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.(MahaMTB-Mumbai Dialogue)
 

यावेळी आ. अमित साटम यांनी मुंबईशी निगडित आणि अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिलीत. ते म्हणाले की, "मुंबईत अधिकृतरित्या ३५ टक्के मराठी भाषिक मतदार आहेत.(MahaMTB-Mumbai Dialogue) आधी फक्त मराठी माणसाच्या गप्पा व्हायच्या. निवडणूकीच्या ६ महिनेआधी आपण त्या गप्पा ऐकायचो. परंतू, पहिल्यांदा मराठी भाषेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मराठी माणसाला तिथेच घर दिले. बीडीडी चाळीतील १६० फुटाच्या घरातील नागरिकांना ५६० फुटाचे घर दिले. त्यामुळे मुंबईतून मराठी माणसाचा टक्का कमी होतो या सगळ्या गप्पा आहेत. पण यावर कृती कुणीच केली नाही. याऊलट मराठी माणसाचा वापर केला. आम्हाला मराठी तरुणांना उद्योजक करायचे आहे आणि तुम्हाला त्यांचा वापर करायचा आहे. मराठी माणसाच्या गप्पा करणाऱ्यांच्या कारकीर्दीत मराठी शाळांची पटसंख्या ७० टक्केपेक्षा जास्त खाली झाली. एखाद्या शहराचा रस्ता कसा आहे यावरून त्या शहराची प्रतिमा तयार होते. मुंबईतील रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ते आहेत ते कळत नाही. इतकी वर्षे मुंबईच्या विकासाचे कुठलेही व्हिजन नव्हते. काही लोकांच्या दुटप्पीपणामुळे मुंबई महापालिकेला भ्रष्ट प्रशासन मिळाले. ते बदलण्याचे काम आता सुरु झाले आहे."(MahaMTB-Mumbai Dialogue)
 
खान हा व्यक्ती नसून मानसिकता
 
"जगातील पश्चिमी देशातील शहरांमध्ये ज्याप्रकारे घुसखोरी झाली, तिथल्या इस्लामिक कट्टरपंथी मूलतत्त्ववादी घटकांनी जसा त्या शहरांचा ताबा घेतला आणि तिकडची जनता शांत राहिली. तिथले राजकीय नेतृत्व उदारमतवादी राहिले. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन कधी सरकली हे त्यांना कळलेच नाही. जगातील अनेक शहरांमध्ये ही परिस्थिती आहे. हे बघता मुंबई शहराच्या दरवाजावरही हा धोका उभा राहिला आहे. इथले काही राजकीय पक्ष मतांच्या लांगुलचालनाकरिता भूमिका घेताल आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी इस्लामिक कट्टरपंथी मूलतत्त्ववादी घटकांना ताकद देतात. त्यामुळे मुंबई शहराचा धोका वाढला आहे. यासाठी आपण सजग आणि सतर्क राहावे ही त्यामागची भूमिका आहे. खान हा व्यक्ती नसून मानसिकता आहे. या शहराचा ताबा घेण्यासाठी आणि रंग बदलण्यासाठी एक नियंत्रित कार्यपद्धती आहे. त्यामुळे जगातील इतर शहरांची अवस्था जशी झाली ती मुंबईची होऊ देऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत," असेही ते म्हणाले.(MahaMTB-Mumbai Dialogue)
 
 
महापौराचे रिमोट कंट्रोल दुसरीकडे होते
 
"येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेचा कला आणि संस्कृती विभाग असावा असावा प्रयत्न करणार आहे. मुंबईकरांचे जीवनमान उंचावणे हा मुंबई महापालिकेचा उद्देश असला पाहिजे. मुंबईची हरवलेली कला आणि संस्कृती येणाऱ्या काळात पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. धारावीतील उद्योग धारावीतच राहणार असून ते बाहेर जाणार नाहीत. मुंबईच्या महापौराकडे खूप अधिकार असतात. परंतू, गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेच्या महापौराचे रिमोट कंट्रोल दुसरीकडे होते. ज्यांच्याकडे रिमोट कंट्रोल होते त्यांनी महापौराला शोभेचे बाहुले करून ठेवले होते. हा रिमोट कंट्रोल वांद्रे पूर्वला होता," अशी टीकाही त्यांनी केली.(MahaMTB-Mumbai Dialogue)
 
निधी असतो पण हेतू आणि प्रामाणिकता नसतो
 
"आपल्याला मुंबईचे शांघाय करायचे नसून मुंबई ही मुंबईच ठेवायची आहे. मुंबई खूप चांगली आहे. पण मुंबईतील फेरीवाल्यांमध्ये बांग्लादेशी, रोहिंग्यांची घुसखोरी झाली आहे. मुंबईत फेरीवाला धोरण न येणे हे त्यामागचे मोठे कारण आहे. मुंबईला स्ट्रीट फुडला एक औपचारिक व्यवस्था मिळाली नाही. पात्र फेरीवाल्यांना फेरीवाला क्षेत्र आरक्षित केले पाहिजे. फेरीवाला क्षेत्रात स्ट्रीट फुडसाठी जागा उपलब्ध करू शकतो. पुढच्या तीन चार वर्षात तुम्हाला एक वेगळीच मुंबई पाहायला मिळेल. मुंबईच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एक तासाच्या आत पोहोचता यावे, हे आमचे व्हिजन आहे. तसेच खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या सोयीसुविधा महानगरपालिकेच्या रुग्णालयांत मिळाव्या, हे आमचे व्हिजन आहे. या सगळ्यासाठी निधी असतो पण हेतू आणि प्रामाणिकता नसतो. सगळ्या पॅनलने विचारलेल्या प्रश्नांचे एका शब्दात उत्तर आहे ते म्हणजे हेतू," असेही आ. साटम म्हणाले.(MahaMTB-Mumbai Dialogue)
 
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रस्ते धुवून काढणे गरजेचे
 
"मुंबईतील नदी नाल्यातील पाणी थेट समुद्रात जाऊन मिळते. स्वत:ला पर्यावरणवादी समजणाऱ्यांना आपले सांडपाणी प्रकल्प असावे, असे का वाटले नाही? येणाऱ्या काळात हे सांडपाणी प्रकल्प आपल्याला सागरी पर्यावरणाची सुरक्षा करण्यासाठी मदत करतील. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील रस्ते धुवून काढणे हे मोठी भूमिका बजावू शकतो. रस्ते धुवून काढले तर मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारू शकते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेचे पर्यावरण विभाग जास्त सक्रीय करणे आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जास्त निधी खर्च करण्याची गरज आहे. डायबीटीज फ्री मुंबई करणे हे भविष्यात मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट असेल," असे त्यांनी सांगितले.(MahaMTB-Mumbai Dialogue)
 
१) मुंबईचा विचार करणाऱ्या लोकांना एकत्र आणणे हा या डायलॉगचा उद्देश
 
"ज्या पक्षात लोकशाही असते त्या पक्षात नव्या नेतृत्वांचा उदय होणे ही प्रक्रिया नसून अपरिहार्यता असते. मुंबई तरुण भारतचे काम हे माध्यम म्हणून अपेक्षा व्यक्त करणे आहे. अमित साटम यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आत्मियतेने मुंबईचे प्रश्न मांडत आले आहेत. मुंबईचा विचार करणारे माध्यम म्हणून मुंबईचा विचार करणाऱ्या लोकांना एकत्र आणणे हा या डायलॉगमागचा उद्देश आहे. मुंबई पालिकेला बेवारस स्वरुप आले आहे. पुढच्या काळात येणारे आव्हान मोठे आहे. मुंबई तरुण भारत, पार्क फाऊंडेशन, आम्ही सगळे आपल्यासोबत खांद्याला खांदा लाऊन उभे राहू."(MahaMTB-Mumbai Dialogue)
- किरण शेलार, संपादक, दै. मुंबई तरुण भारत
 
२) मराठी मतदारांचा टक्का घसरला का?
 
किरणजी जेव्हा एबीपी माझाला ही संकल्पना घेऊन आले तेव्हा डायलॉग हा शब्द मला खूप आवडला. आपण खूप बोलत असतो परंतू, त्यातील संवाद हा अर्थच कुठेतरी हरवून गेलेला आहे. त्यात हा संवाद मुंबईकरांचा होता. मुंबई ही जगातील सर्वात श्रीमंत नगरी आहे. पण सर्वसामान्य मुंबईकर श्रीमंत नाही. मुंबईचा नागरिक सर्वात छोट्यात छोट्या घरात राहतो. तो अजूनही लोकलच्या डब्यात प्रवास करतो. मुंबईचा आत्मा त्या व्यक्तीकडे आहे. पण त्याच्याकडे दुसरा पर्याय आहे का? त्याला त्याच्या परिवारासाठी कामावर निघावेच लागते. या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा यासाठी आम्ही मुंबई डायलॉग या कार्यक्रमात सहभागी झालोत. मराठी मतदारांचा टक्का इतका घसरला का? की, तो इतका असंबद्ध झालाय? असा प्रश्न त्यांनी विचारला.(MahaMTB-Mumbai Dialogue)
- सरिता कौशिक, कार्यकारी संपादक, एबीपी माझा
 
३) मुंबईचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर साजरा व्हावा
 
मुंबईकरांच्या धावत्या जीवनातून त्यांना कला, नाट्य आणि संगीताचा आस्वाद घेण्यासाठी खुले रंगमंच उपलब्ध करून देता येईल का? जेणेकरून मुंबईकरांवरचा ताण कमी होईल. मुंबईची सांस्कृतिक बैठक हरवते आहे असे सतत वाटते. ढोल पथके जिथे जागा मिळेल तिथे तालिम करतात. ढोल पथक हे मुंबईत मानाचा घटक आहेत. पण त्यांना तालिम करण्यासाठी हक्काची जागा मिळेल का? ओपन थिएटर्स बंद पडताहेत. सगळे नियम सांभाळून संगीत, नाट्य हा मुंबईचा सांस्कृतिक वारसा आपण जागतिक पातळीवर का साजरा करणे गरजेचे आहे.(MahaMTB-Mumbai Dialogue)
- वैशाली सामंत, प्रसिद्ध गीतकार-संगीतकार
 

४) धारावीतील उद्योजकांना तिथेच व्यवसायासाठी जागा मिळणार का?
 
मुंबईच्या अनेक महत्वाच्या जागांचा पुनर्विकास होतो आहे. धारावीमध्ये अनेक उद्योग आहेत. पुनर्विकासाच्या आराखड्यात छोट्या उद्योजकांना त्याठिकाणी त्यांचे व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. उपयुक्तता कॉरिडॉर ७० वर्षांपूर्वी न्यूयॉर्कची स्थिती मुंबईसारखी होती. तिथल्या महापौराने न्यूयॉर्कचा कायापालट केला. आपण निवडून आल्यानंतर मुंबईतील महापौराकडे कार्यकारी अधिकार असणार का?(MahaMTB-Mumbai Dialogue)
श्रीराम दांडेकर, उपाध्यक्ष, कॅम्लिन कोकायू
 
५) मुंबईच्या खाद्य संस्कृतीचे संवर्धन गरजेचे
 
मुंबईतील इराणी कॅफे, खानावळींची वाईट अवस्था झाली आहे. यामुळे मुंबईची खाद्यसंस्कृती हरवताना दिसते आहे. ते बंद पडत आहेत. स्ट्रीट फुडची खाद्य संस्कृती हरवली आहे. या खाद्य संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणे गरजेचे आहे.(MahaMTB-Mumbai Dialogue)
- शक्ती साळगावकर, कार्यकारी संचालक, कालनिर्णय
 
६) कोस्टल रोडमुळे वाहतूक विभागली गेली
 
आज मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड गर्दी असते. परंतू, कोस्टल रोडने प्रचंड फरक पडला आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक विभागली गेली आहे. प्रकल्प जिथे छोट्या रस्त्यांना येऊन मिळतात तिथे अनेक बॉटल नेक तयार झाले आहेत. याठिकाणची वाहतूक कोंडी सोडवणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असतात. रस्ते खोदलेले असतात. मात्र, त्याठिकाणी त्याची माहिती मिळत नाही किंवा योग्य दिशादर्शन केले जात नाही. यावर मुंबई महापालिकेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मुंबई सुरु असणारे अनेक मोठे पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. हे प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण केले जातील. मुंबईत झोपडपट्ट्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी आपले व्हिजन काय असेल? आणि भाडेतत्वावरील घरे ही संकल्पना कशी राबवत आहोत?(MahaMTB-Mumbai Dialogue)
- निखील दिक्षित, सीईओ, शिल्प असोसिएट्स
 
७) मुंबईतील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करणे आवश्यक
 
दक्षिण मुंबईत चार वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि २ दंत महाविद्यालये आहे. मात्र, मुंबई उपनगर लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असताना तिथे केवळ २ दंत महाविद्यालये आहेत. ही विसंगती आपण दूर करणे गरजेचे आहे. मुंबईतील सर्व दवाखान्यांमध्ये केवळ १३ हजार बेड आहेत. दरवर्षी या दवाखान्यात २५ लाख लोक भरती होतात. गेल्या १० वर्षांपासून हा ताण आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या आपल्या मुलभूत गरजा आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील हा ताण कमी करणे आवश्यक आहे.(MahaMTB-Mumbai Dialogue)
डॉ. गजानन रत्नपारखी, हृदयरोगतज्ञ
 
८) मुंबईतील वायू प्रदूषणाची स्थिती हाताळणे गरजेचे
 
मुंबईत पाणी व्यवस्थापन, घनकचरा, वाढते वायूप्रदुषण, नद्या असे अनेक प्रश्न आहेत. ‘नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम’अंतर्गत सर्वाधिक निधीचे वाटप (९३८.५९कोटी) हे मुंबईसाठी करण्यात आलेले असतानाही, मुंबई महापालिकेने त्यामधील केवळ ६१ टक्के निधी खर्च केला आहे. या सर्व परिस्थितीत आता हिवाळ्याच्या तोंडावर मुंबईत भीषण होणारी वायू प्रदूषणाची परिस्थिती पाहता, निधीचा पुरेपुरे वापर आणि कोणत्या प्रकारचे निर्बंध आणून आपण मुंबईतील वायू प्रदूषणाची स्थिती हाताळू शकतो?(MahaMTB-Mumbai Dialogue)
- अक्षय मांडवकर, वरीष्ठ पर्यावरण प्रतिनिधी, दै. मुंबई तरुण भारत
 


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....