मुंबई : (Ladki Bahin Scheme) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Scheme) ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.(Ladki Bahin Scheme)
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Scheme) संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया (Ladki Bahin Scheme) करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Scheme) योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया (Ladki Bahin Scheme) वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Scheme) ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे."
"तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी (Ladki Bahin Scheme) करावे आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र तसेच घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया (Ladki Bahin Scheme) पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की, त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी," असे आवाहनही मंत्री आदिती तटकरे यांनी केले. (Ladki Bahin Scheme)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....