मुंबई : (Sangh Swayamsevak) कर्नाटक ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे यांचा राजकीय गड मानल्या जाणाऱ्या चित्तापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (Sangh Swayamsevak) रविवारी पथसंचलन काढले. तहसीलदारांनी मागील महिन्यात संभाव्य कायदा-सुव्यवस्था समस्या तसेच सरकारी जमिनी आणि सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमावर निर्बंध घालण्याच्या सरकारी निर्णयाचा हवाला देत परवानगी नाकारल्यानंतर हा वाद राज्यभरात चर्चेत आला होता मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने या कार्यक्रमासाठी परवानगी दिल्याने संचलन काढण्यात आले. (Sangh Swayamsevak)
एकूण ३०० गणवेशधारी स्वयंसेवक आणि ५० जणांच्या घोष पथकाने संचलनात भाग घेतला. (Swayamsevak Sangh) बजाज कल्याण मंडप येथून सुरू झालेल्या पथसंचलनाचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हजारो नागरिकांनी गर्दी केली. त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, जय श्री राम, जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली. संपूर्ण शहरात भगवे झेंडे आणि पताका लावण्यात आल्या होत्या. चार ठिकाणी स्वागत कमानीही उभारण्यात आल्या होत्या. स्थानिकांनी स्वयंसेवकांवर (Sangh Swayamsevak) फुलांचा वर्षाव केला.(Sangh Swayamsevak)
यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकूण १२०० पोलिस कर्मचारी यावेळी तैनात होते. पोलिसांनी शहरात येणाऱ्या चारही महामार्गांना बंद करून वाहनांची तपासणी केली. चित्तापुर नगरपरिषद आणि पोलीस विभागाने मार्गावर ५६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी १० ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर केला. स्थानिक स्वराज्य संस्थेने (Sangh Swayamsevak) २०० झेंडे, पताका आणि फ्लेक्स लावण्यास परवानगी दिली होती.(Sangh Swayamsevak)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.