Bihar Assembly Election Result 2025 : "निकालाने धक्का बसण्याची..."; संजय राऊत यांची बिहारच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया

    14-Nov-2025   
Total Views |


मुंबई : (Sanjay Raut on Bihar Assembly Election Result 2025) बिहार निवडणुकीचे निकाल आज निकाल जाहीर होणार आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि. १४) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु आहे. अंतिम फेरीतील मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल हाती येईल. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना महागठबंधनच्या अपयशावर उबाठा खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना म्हटले आहे की, “बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!. एकदम महाराष्ट्र पॅटर्न!. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना ५० च्या आत संपवले!” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\