Children's Day : जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे बालदिन उत्साहात साजरा

    14-Nov-2025   
Total Views |
 
Children
 
कल्याण : (Children's Day) जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे बालदिन (Children's Day) अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.
 
कार्यक्रमाची सुरुवात भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती ललिता पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू (Children's Day) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी राहनाळ गावचे प्रभारी सरपंच प्रताप पाटील, ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील, दीपक भोईर, मनीषा भोईर तसेच युवा कार्यकर्ता संकल्प भोईर उपस्थित होते. (Children's Day)
 
 
प्रताप पाटील म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे महान व्यक्तिमत्त्व, देशप्रेम, लोकशाहीविषयक दृष्टीकोन आणि मुलांप्रती असलेले अपार प्रेम यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. मनीषा भोईर यांनी शाळेत आले की लहान झाल्यासारखे वाटते, तो आनंद इथेच मिळतो, मुलं ही हासरी फुले आहेत असे सांगत विद्यार्थ्यांना बालदिनाच्या (Children's Day) शुभेच्छा दिल्या.
 
ललिता प्रताप पाटील यांनी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. मुलांनी पंडित नेहरू (Children's Day) यांचा एक तरी गुण अंगी बाळगून आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे आवाहन केले. ग्रामपंचायत सदस्य दीपक भोईर, मनीषा भोईर आणि संकल्प भोईर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स आणि खाऊचे वाटप करण्यात आले. (Children's Day)
 
कार्यक्रमात विद्यार्थी सिद्धे पांडे आणि रुद्र झुंजारराव यांनी पंडित जवाहरलाल नेहरू (Children's Day) यांच्या जीवनाविषयी मनोगत सादर केले. इयत्ता दुसरी आणि तिसरीतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.(Children's Day)
 
 
मुख्याध्यापक अजय पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू (Children's Day) यांच्या मुलांवरील प्रेमाची प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांशी शेअर केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अंकुश ठाकरे आणि रूपाली सांबरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संगीता पाटील यांनी केले. (Children's Day)
 
अतिशय आनंदी, प्रसन्न आणि उत्साही वातावरणात जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे बालदिनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. (Children's Day)