मुंबई : (Bihar Assembly Election Result 2025) बिहार निवडणुकीचे निकाल आज निकाल जाहीर होणार आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि. १४) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु आहे. अंतिम फेरीतील मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल हाती येईल. मात्र, निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. दुपारी १ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडून आलेले कल आहेत, त्यानुसार बिहारच्या जनतेने महागठबंधनला सपशेल नाकारल्याचे चित्र आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येणार असल्याची शक्यता निवडणूक निकालांचे कल दाखवत आहेत.
दुपारी २ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाचे कल:
भाजप - ९० जागांवर आघाडीवर
जेडीयू - ८० जागांवर आघाडीवर
राजद - २८ जागांवर आघाडीवर
एलजेपी - २१ जागांवर आघाडीवर
काँग्रेस - ५ जागांवर आघाडीवर
एआयएमआयएम - ५ जागांवर आघाडीवर
एचएएमएस - ५ जागांवर आघाडीवर
सीपीआयएमएल - ३ जागांवर आघाडीवर
आरएलएम - ४ जागांवर आघाडीवर
सीपीआयएम - १ जागेवर आघाडीवर
बसपा - १ जागेवर आघाडीवर