WARN Asia Conference : वॉर्न आशिया परिषद नुकतीच संपन्न

    12-Nov-2025   
Total Views |
 
WARN Asia Conference
 
डोंबिवली : (WARN Asia Conference) थायलंड मधील हुआ हिन येथे वाइल्डलाइफ फेंड्र्स फाऊंडेशन थायलंड डब्ल्यूएफएफटी द्वारे आयोजित ‘वॉर्न आशिया परिषद’ (WARN Asia Conference) नुकत्याच संपन्न झाली.
 
या परिषदेसाठी 20 देशातील 50 हून अधिक संघटना एकत्र आल्या होत्या. तसेच 100 वन्यजीव रक्षक ह्या परिषदेत सहभागी झाले होते. यंदाच्या वर्षी ‘वन्यजीवांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करणे’ (WARN Asia Conference) आशियातील अविश्वसनीय जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी समर्पित तज्ञ आणि समर्थकांना एकत्र आणते अशी थीम ठरविली होती. या परिषदेच्या माध्यमातून प्रेरणादायी भाषणे, संवादात्मक कार्यशाळा, आकर्षक सादरीकरण आणि वन्यजीव संवर्धनाच्या आघाडीच्या क्षेत्रात काम करणा:या इतरांशी जोडण्यासाठी, शिकण्यासाठी आणि सहयोग करण्यासाठी भरपूर संधी मिळत असल्याचे सहभागींनी सांगितले.
 
 
वन्यजीव पुर्नवसन, पशुकल्याण आणि पर्यावरण (WARN Asia Conference)  याविषयी गेली 25 वर्ष सातत्याने पॉज संस्था काम करत आहे. या संस्थेचे निलेश भणगे यांनी वीस वर्षात हत्तीविषयी रिसर्च, हत्तीची सुटका, उपचार आणि पुर्नवसन आणि कायदेशीर काम यावर परिषदेत सादरीकरण केले. (WARN Asia Conference)
 
चौकट- ‘पॉझ ’च्या कामाला यश
 
महाराष्ट्र आणि गोवा मधील पाळीव हत्तींचा अभ्यास करून दिल्ली कोर्टामध्ये रिपोर्ट सादर केले आहेत. त्यासंदर्भात रिट पिटीशन ही दाखल केली आहे. रीसर्चचे पाच रिपोर्ट प्रसिध्द ही झाले आहेत. यामध्ये सर्कशीतील हत्ती, मंदिर मधील हत्ती, रस्त्यावरील हत्ती, झु मधील हत्ती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट (WARN Asia Conference)  मधील हत्ती याचा समावेश आहे. पॉझच्या प्रयत्नांनी रस्त्यावर भीक मागून फिरणारे हत्ती आता बंद झाले आहे. (WARN Asia Conference)