Bihar Exit Poll 2025 : बिहारमध्ये भाजप-एनडीए पुन्हा सत्तेत! महागठबंधन शंभरी पार करण्यातही अपयशी

    11-Nov-2025   
Total Views |

Bihar Exit Poll 2025

मुंबई :
(Bihar Exit Poll 2025) बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. या निवडणुकीचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी पार पडला, तर ११ नोव्हेंबर दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. बिहारच्या जनतेने या निवडणुकीत कोणाला कौल दिला, हे अंतिम निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी बिहार निवडणुकीचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाला आहे. मात्र, त्याआधी मतदान पूर्ण झाल्यानंतर संभाव्य निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे.

मतदानाआधी जाहीर झालेल्या ओपिनियन पोल्समधून बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोल्सची आकडेवारी देखील सारखीच आहे. पीपल्स पल्स, पीपल्स इन्साईट, मॅट्रीझ, दैनिक भास्कर, मार्क व जेव्हीसी या कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीची निवड केली आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे.

MATRIZE-IANSच्या एक्झिट पोलनुसार,
एनडीए - १४७ ते १६७
महागठबंधन - ७० ते ९०

पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार,
एनडीए - १३३ ते १५९
महागठबंधन - ७५ ते १०१
जन सुराज्य - ० ते ५
इतर - २ ते ८

पीपल्स इनसाईट पोलनुसार,
एनडीए - १३३ ते १४८
महागठबंधन - ८७ ते १०२
जन सुराज्य - ०-२
इतर - २ ते ८

JVC पोलनुसार,
एनडीए - १३५ ते १५०
महागठबंधन - ८८ ते १०३
जन सुराज्य - ०-१
इतर - ३ ते ६

चाणक्य स्ट्रॅटेजीजनुसार,
एनडीए - १३० ते १३८
महागठबंधन - १०० ते १०८
जन सुराज्य - ०
इतर - ३ ते ५

एबीपीच्या एक्झिट पोलनुसार,
एनडीए - १३३ ते १४८
महागठबंधन - ८७ ते १०२
इतर - ३ ते ५

दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार,
एनडीए - १४५ ते १६०
महागठबंधन - ७३ ते ९१
जन सुराज्य - ०-३
इतर - ५ ते १०



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\