केडीएमसीतर्फे महर्षि वाल्मिकी यांच्या जयंती दिनी अभिवादन !

    07-Oct-2025   
Total Views |

कल्याण : महर्षि वाल्मिकी यांच्या जयंती दिनी मंगळवारी महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात आमदार राजेश मोरे यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित उपायुक्त समीर भुमकर, संजय जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.माहिती व जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत, सुरक्षा अधिकारी भरत बुळे तसेच उपस्थित नागरीकांनी देखील महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.