भारतातील सर्वाधिक लांबीची पहिली भूमिगत मेट्रो पूर्ण!

Total Views |

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांचा प्रवास आता आणखी फास्ट होणार आहे. मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गावरील मेट्रो ३ मार्गातील पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीरीत्या प्रवाशांसाठी सुरु झाला आहे. यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी या मार्गिकेचा शेवटचा टप्पा मुंबईकरांसाठी खुला होतो आहे. मुंबईतील ही पहिली भूमिगत मेट्रो आहे. त्यामुळे याची मुंबईकरांना मोठी उत्सुकता आहे. शहराच्या वर्दळीच्या भागातून ही मेट्रो जाणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांची ट्रॅफिक जाम आणि लोकलच्या गर्दीतून सुटका होणार असून त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

किती झाला खर्च ?

२०११ मध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा त्यांची किंमत २३ हजार कोटी होती त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हा प्रकल्प पूर्णत्वास आला. मेट्रो कारशेडचे कामही पूर्ण झाले. २२ हेक्टर जागेवर ते साकारले आहे. आज मेट्रो-३ प्रकल्पाची किंमत ३७ हजार कोटी झाली आहे. आरेमधील कारशेडला झालेला विरोध त्या भोवतीच्या राजकारणामुळे मेट्रोची किंमत वाढली.

तिकीटदर नेमका काय असेल?

कफ परेड ते आरे जेव्हीएलआर

कफ परेड -विधानभवन - चर्चगेट - १० रुपये

कफ परेड- हुतात्मा चौक- छशिमट - २० रुपये

कफ परेड- गिरगाव- ग्रांट रोड - ३० रुपये

कफ परेड- मुंबई सेंट्रल- महालक्ष्मी- सायन्स म्युझियम- आचार्य अत्रे चौक- ४० रुपये

कफ परेड- वरळी- सिद्धिविनायक- दादर- शितलादेवी - ५० रुपये

कफ परेड- धारावी - बीकेसी- वांद्रे- सांताक्रूझ- ६० रुपये

कफ परेड- मुंबई विमानतळ टी १- सहार- मुंबई विमानतळ टी २- मरोळ नाका- एमआयडीसी- सिपझ- आरे जेव्हीएलआर - ७० रुपये


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.