संजय राऊत 'मॅन ऑफ कमिशन'; नवनाथ बन यांचे टीकास्त्र

    04-Oct-2025   
Total Views |

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मॅन ऑफ मिशन आहेत तर, संजय राऊत मॅन ऑफ कमिशन आहेत, अशी खरमरीत टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी केली.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मॅन ऑफ मिशन आहेत तर संजय राऊत मॅन ऑफ कमिशन आहेत. अलिबागमध्ये राऊत यांच्या नावाने १० प्लॉट आहेत. हे प्लॉट कसे खरेदी केले याचे सगळे सातबारे आमच्याकडे आहेत. देवाभाऊंनी मिशन हाती घेऊन महाराष्ट्राचा कायापालट केला तर संजय राऊत यांनी खंडणी वसूल करून कमिशन खाल्ले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची त्यांची पात्रता नाही."

राऊत पगारी नेते

"संजय राऊत पगारी नेते आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. नाशिकचे संपर्क प्रमुख असताना संजय राऊतांनी कसे लुटले याचा संपूर्ण हिशेब आमच्याकडे आहे. बावळट मुख्यमंत्री कोण आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात जाण्याला बावळटपणा म्हणतात. शिवाजी पार्कच्या सभेत एक रुपयाच्या मदतीची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली नाही. पंतप्रधान मोदी आणि देवाभाऊ शेतकऱ्यांच्या सोबत असून अडीच हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेल्या कोकणातील वादळात शेतकऱ्यांना दमडीही दिली नाही," असेही ते म्हणाले.

राऊतांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध

संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची पाद्यपूजा करावी. त्यांना खासदारकीची उमेदवारी देताना शिवसेनेतील अनेक लोकांनी विरोध केला होता. ते आपले नसून काँग्रेसचे आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. तरीही हा विरोध डावलून उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....