रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पाच्या उभारणीसाठी टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रिब्युशनसोबत वीज खरेदी करार!

Total Views |


मुंबई : (Tata Power Renewable Energy Limited) टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची उपकंपनी असणाऱ्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने ८० मेगावॅट क्षमतेच्या फर्म आणि डिस्पेचेबल रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पासाठी टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रिब्युशनसोबत वीज खरेदी करार (पीपीए) केला आहे. हा प्रकल्प सर्वात जास्त मागणी काळात विश्वसनीय ऊर्जा वितरण सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रिड स्थिरता मजबूत करण्यासाठी प्रगत सौर, पवन आणि बॅटरी स्टोरेज सिस्टम एकत्रित करेल, अशी माहिती टाटा पॉवरने दिली आहे.

हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण होईल. यामध्ये दरवर्षी अंदाजे ३१५ दशलक्ष युनिट्स वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामध्ये दरवर्षी ०.२५ दशलक्ष टनांपेक्षा जास्त घट होईल. सर्वात जास्त मागणी काळात ४ तास वीज पुरवठ्याप्रती वचनबद्धता हे या उपक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामुळे सर्वात जास्त मागणी काळात किमान ९०% उपलब्धता सुनिश्चित होईल आणि टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रिब्युशनच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण होतील.

हा प्रकल्प टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रिब्युशनला राज्य नियामक आयोगाने आखून दिलेल्या रिन्यूएबल पर्चेस ऑब्लिगेशन पूर्ण करण्यास लक्षणीयरीत्या मदत करेल. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, निर्माण होणारी स्वच्छ ऊर्जा टाटा पॉवरच्या मुंबई डिस्ट्रिब्युशन नेटवर्कमध्ये अखंडपणे एकत्रित केली जाईल. ज्यामुळे निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ८,००,००० ग्राहकांना विश्वासार्ह वीज पुरवठा होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.