मुंबई : (World Music Day) जागतिक संगीत दिनानिमित्त दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये 'मेलांज' विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित मिलिंद रायकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमामध्ये संगीत रसिकांना एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा अनुभव घेता येणार आहे. रायकर अॅकडमी ऑफ व्होईलीन तथा 'द बोम्बे स्ट्रींग' या गटाच्या माध्यमातून दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सूर संवादाच्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आनंद रायकर अकॉर्डियनवर तर मास्टर यज्ञेश रायकर व्होईलन सादर करणार आहेत. सोहम पराळे तबल्यावर तर रितीकेश दळवी पखवाजावर साथ करणार आहेत. दिलीप मेजारी रिदम गिटर तर अनुज दानैत बास गिटर आणि चेतन परब हे तालवाद्याची साथ करणार आहेत. सदर कार्यक्रमात संगीत संयोजन डेव्हीड प्रिन्स यांनी केले असून, रिषा दत्त या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. सदर कार्यक्रम निशुल्क असून, संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.