१८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करा; मंत्री आदिती तटकरे यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

    29-Oct-2025   
Total Views |

Aditi Tatkare
 
मुंबई : ( Aditi Tatkare ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. ई-केवायसी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांवर उपाययोजनांसंदर्भात पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
 
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा १८ सप्टेंबर पासून दोन महिन्याच्या कालावधी करीता उपलब्ध करण्यात आली आहे. ई-केवायसी ची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ असून आत्तापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रकिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. इतर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी."
 
हेही वाचा :  Mangal Prabhat Lodha : बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला, त्रिपुरी पौर्णिमेला होणार भव्य आरती
 
ई-केवायसीची प्रक्रिया सोपी आणि सुलभ
 
"ई-केवायसीच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केले जात आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ असून महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पुर्ण करू शकतात. ज्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांनी १८ नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पुर्ण करावी," असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....