मुंबई : ( Anil Mundhe ) मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या प्रवक्ते पदावर अनिल का. मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते शिक्षक चळवळीतले अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्ते असून शिक्षक पात्रता परीक्षेच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना अनिल मुंढे म्हणाले, “ही नियुक्ती शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी आहे. आगामी काळात शिक्षकांच्या हितासाठी प्रभावी भूमिका पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील.”
हेही वाचा : बीड जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सुरुवात !
यावेळी मुंढे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, स्पष्ट विचारसरणी आणि शिक्षक समाजाशी असलेली बांधिलकी शिक्षक विकास मंडळाच्या कार्याला निश्चितच नवी दिशा देईल, असे मत मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे डॉ. विशाल कडणे यांनी व्यक्त केले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....