मुंबई : (Salman Khan's viral remark) बॉलिवूडमधील तीन मोठे सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे तिघेही नुकत्याच सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या जॉय फोरम २०२५ या भव्य कार्यक्रमात एका मंचावर एकत्र दिसले. या तिघांची उपस्थिती चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरली. मात्र, या कार्यक्रमादरम्यान सलमान खानने केलेले एक वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
कार्यक्रमादरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीचा जागतिक विस्तार आणि प्रभावाबद्दल बोलताना सलमान म्हणाला. "सध्या जर तुम्ही हिंदी चित्रपट तयार केला आणि तो येथे प्रदर्शित केला, तर तो सुपरहिट ठरतो. तमिळ, तेलुगू, मल्याळम असे कोणतेही भारतीय चित्रपट असोत ते शेकडो कोटींचा व्यवसाय करत आहेत, कारण विविध देशांतील लोक येथे काम करत आहेत. "मात्र त्यानंतर सलमानने पुढे केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. त्याने सांगितले, "आपल्या देशातील अनेक लोक येथे आले आहेत. बलुचिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इतर ठिकाणांहून सुद्धा लोक येथे काम करतात."
या एका वाक्यानंतर सोशल मीडियावर चर्चा आणि वाद सुरू झाला आहे. अनेकांनी सलमानने बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्याचे लक्षात घेतले आणि यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही वापरकर्त्यांनी लिहिले की, "सलमान खानने शेवटी कबूल केले की बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नाही." तर काही जण म्हणाले की कदाचित सलमानची जीभ चुकली असावी आणि त्याचा हेतू वेगळा असावा. 'बिलाल बलोच' नावाच्या एका वापरकत्यनि 'एक्स' (माजी द्विटर) वर लिहिले, "सलमान खानने बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान वेगवेगळे उल्लेख केले. हे त्याचे मोठे विधान आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\