जेरुसलेम : (16 killed in Israeli attack on Gaza) गाझातील युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच २० कलमी शांतता प्रस्ताव जाहीर केला असला, तरी इस्रायलने बुधवारी गाझा पट्टीवर पुन्हा हल्ले केले. या हल्ल्यांत किमान १६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
ट्रम्प यांच्या योजनेला दहशतवादी संघटना हमासने अद्याप मान्यता दिलेली नाही. यावर ते काय भूमिका घेणार, याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे. दरम्यान, गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांना दहशतवादी अथवा दहशतवाद्यांचे समर्थक घोषित केले जाईल, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री यांनी दिला आहे. गाझा त्वरित रिकामी करण्याचे आवाहन करताना त्यांनी, ही अखेरची संधी आहे, अशी धमकी दिली.
झेतून भागातील अल्-फलाह शाळेत विस्थापित नागरिकांनी आश्रय घेतला होता. मात्र बुधवारी अवघ्या काही मिनिटांच्या अंतरात झालेल्या दोन मोठ्या हल्ल्यांत या शाळेवरही बॉम्बवर्षाव करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सादर केलेला शांतता प्रस्ताव आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\