मुंबई : ( Minister Pankaja Munde Celebrates Diwali with Orphaned Children ) पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने सहभाग घेतला. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि द चिल्ड्रन्स एड सोसायटी फॉर अंडरप्रिव्हिलेज्ड किड्स ऑर्फनेजच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आधुनिक कला दालन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी भेट दिली.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुलांसोबत आकाशकंदील तयार केले. तसेच पणत्या रंगवल्या आणि चित्रकला उपक्रमात सहभागही घेतला. याप्रसंगी आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळेचे आणि प्रसिद्ध कलाकार ए. ए. अल्मेलकर यांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, "ही अनाथ मुले कोणत्या जातीची, धर्माची आहेत हे महत्त्वाचे नाही, तर ती माणसांची आहेत आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद हा समाजासाठी प्रेरणादायी आहे. असा समाज घडला पाहिजे, जिथे प्रत्येक माणूस स्वतःची ओळख स्वतः निर्माण करेल. प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी पर्यावरण विभागाने समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे असून सर्व नागरिकांनी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा," असे आवाहन त्यांनी केले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....