महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेचे मापन

    18-Oct-2025   
Total Views |

Maharashtra Pollution Control Board
 
मुंबई : ( Maharashtra Pollution Control Board )  पर्यावरण विषयक जनजागृतीचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील दिवाळीत बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या एकूण विविध २५ कंपन्यांच्या फटाकांच्या आवाजाच्या तिव्रतेचे नुकतेच मापन केले.
 
आवाज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकूण २५ विविध कंपन्यांच्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता तपासली असता यावर्षी एकही फटाका हा विहीत मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले नाही. फटाक्यांच्या आवाजाची जास्तीत जास्त तीव्रता ही १२५ डेसिबल ही विहीत मर्यादा यावर्षीच्या मोजमापात पाळली गेली असून एकूण २५ ब्रॅण्डपैकी जास्तीत जास्त आवाजाची तीव्रता ही ९७.१ डेसिबल इतकी आढळून आली आहे. यामध्ये काही कंपन्यांच्या फटाक्यांच्या वेष्टनावर ध्वनीची तीव्रता नोंदवली नसल्याचे दिसून आलेआहे. या सर्व निरीक्षणाची नोंद डायरेक्ट ऑफ एक्सप्लोजिव्ह यांना पत्रान्वये कळवण्यात येणार आहे.
 
 
एकूण १५८ ठिकाणी मोजणार ध्वनीची पातळी
यावर्षी दिवाळी उत्सवात ध्वनीची पातळी राज्यातील एकूण १५८ ठिकाणी मोजली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषन नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम आणि सदस्य सचिव एम. देवेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....