मुंबई :(Gujarat Cabinet Expansion) भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरात सरकारमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार गुरुवारी १६ ऑक्टोबरला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वातील १६ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. यानंतर गुजरात सरकारने आज शुक्रवारी १७ ऑक्टोबरला २६ मंत्र्यांसह नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे.
गुजरात सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे आहेत. यामध्ये क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सुरू झाला आहे. हर्ष संघवी हे पहिले शपथ घेणारे होते. त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी ते राज्याचे गृहमंत्री होते.
गुजरातच्या नवीन कॅबिनेट मंत्र्यांची संपूर्ण यादी :
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\