संघाची स्थापना - एक दैवी योगायोग!

    16-Oct-2025
Total Views |
Rashtriya Swayamsevak Sangh
 
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे असे संघटन आहे, जे विशुद्ध भारत, भारतीयता आणि भारतीयांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. ‌‘राष्ट्रनिर्मिती‌’ आणि ‌‘राष्ट्र प्रथम‌’ या तत्त्वांशिवाय संघाच्या केंद्रस्थानी इतर कोणताही विचार नाही. या काळात काही कार्यकर्त्यांशी संपर्क आल्यानंतर माझ्या जीवनाला एक नवीन आणि सकारात्मक दिशा मिळाली. ही एक दैवी प्रवृत्ती आहे. कारण, जेव्हा आपण त्यागी आणि निःस्वार्थी व्यक्तींशी भेटता, तेव्हा एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजयादशमीच्या पावन प्रसंगी राष्ट्रसेवेची एक शताब्दी पूर्ण केली. मी दि. 31 मे 2011 रोजी भारतीय सेनेतून निवृत्त झालो. त्या काळापर्यंत मला संघाबद्दल फक्त वृत्तपत्रे, मासिके किंवा अधूनमधून होणाऱ्या राजकीय चर्चांमधूनच माहिती होती. निवृत्तीनंतर मला संघाच्या काही कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्या काळात मला अप्रत्याशित असा आनंद अनुभवायला मिळाला. पदाधिकाऱ्यांची आत्मीयता आणि सहज वर्तन मला अतिशय भावले. हळूहळू मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीत पूर्णपणे रमून गेलो आणि लवकरच या महान परिवाराचा एक छोटा भाग बनलो.
 
‌‘व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण‌’ हे वाक्य केवळ एक घोषवाक्य नाही; गेल्या 12 ते 13 वर्षांत या विचाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी केली जाते, हे मी स्वतः पाहिले आहे. देशात जेव्हा केव्हा एखादी समस्या उद्भवते, तेव्हा संघामध्ये तिच्यावर सखोल चिंतन आणि सामूहिक चर्चा केली जाते. समस्येच्या निराकरणासाठी विविध पर्यायांवर एकत्रित विचार करून निर्णय घेण्याची पद्धत ही संघाची एक विशेष वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे.
 
मी हे पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हा एक दैवी योगायोग आहे. भारताची ओळख, संस्कृतीची सातत्यता, भाषा, परंपरा आणि वारसा यांचे संरक्षण करण्यासाठी ईश्वराच्या प्रेरणेनेच या संघटनेची स्थापना झाली, असे वाटते. जर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली नसती, तर आज आपल्या भारताचे भविष्य कसे असते, हे कोणीही निश्चित सांगू शकले नसते, फक्त कल्पना करता आली असती. आज ही संघटना एका विशाल वटवृक्षाच्या स्वरूपात उभी आहे. हे फक्त त्या महान विभूतींच्या संघर्ष, त्याग, तपस्या आणि बलिदानामुळे शक्य झाले आहे, ज्यांनी संघाच्या स्थापनेपासून ते 100 वर्षांच्या प्रवासापर्यंत आपले सर्वस्व अर्पण केले. मी स्वतःही एक सैनिक आहे, त्यामुळे निःस्वार्थ सेवा, ‌‘सेवा परमो धर्मः‌’ आणि बलिदान या शब्दांचा अर्थ मला चांगला माहीत आहे. पण, ज्या प्रकारे राष्ट्रप्रेम, समाजसेवा आणि ‌‘राष्ट्र प्रथम‌’ची भावना संघाचे प्रचारक प्रदर्शित करतात, त्याची तुलना आजच्या काळात शक्य नाही. ही एक उत्कृष्ट, अद्वितीय आणि अनुकरणीय जीवनमूल्ये आहेत, जी केवळ संघाच्या प्रत्यक्ष सहभागातूनच अनुभवली जाऊ शकतात.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार आज राष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात झाला आहे. जनजाती व त्यांच्या उत्थानाचे कार्य, महिला सशक्तीकरण, लोकसंख्येतील असमतोल, राष्ट्रीय सुरक्षा, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास, आरोग्यसेवांचा विस्तार व आधुनिकीकरण, कृषी क्षेत्रातील सुधारणा, विश्वासार्ह प्रसारमाध्यमे, विचारविनिमयनिर्मिती, शिक्षणपद्धतीचे भारतीयकरण, नागरिक कर्तव्यांची जाणीव, नक्षलवादी हालचालींवर नियंत्रण, ईशान्य भारताचा विकास, भारतीय वारसा व परंपरांचे रक्षण, पारंपरिक भाषांचा विकास, भारतीय आहार संस्कृतीचा अभिमान, न्यायव्यवस्थेचे भारतीयकरण, प्रशासनिक सुधारणा, रोजगारनिर्मिती, स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि आत्मनिर्भरता अशा सर्व क्षेत्रांत संघाने कार्य केले आहे. या सर्व क्षेत्रांत संघाने गुणात्मक आणि प्रामाणिक कार्याचा आदर्श ठेवला. संघ पुढेही या सर्व क्षेत्रांत सातत्याने आणि समर्पणाने कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. ‌‘पंचपरिवर्तन‌’ हे त्याचे ठोस प्रमाण आहे.
 
मी एक अतिशय महत्त्वपूर्ण दृष्टिकोनाकडे सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो; संघात जेव्हा आपण पूर्णपणे रमून जाता, तेव्हा आपण राष्ट्रातील सर्वांत शिक्षित, अनुभवी आणि त्यागी पुरुषांच्या सहवासात आहोत, असा अनुभव स्वतःला येतो. हा अनुभव फक्त पुस्तकांमधून नाही, तर मैदानी पातळीवर जाऊन, लोकांशी भेटून, स्वयंसेवकांशी संवाद साधून आणि त्यांच्या सान्निध्यात राहून प्राप्त होतो. ‌‘साधे जीवन, उच्च विचार‌’ या तत्त्वाला प्रत्यक्षात उतरवणारे हे संघटन आणि स्वयंसेवक कधीही कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. श्रेय घेणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नाही. सेवा, साहाय्य, गरीब कल्याण, सामाजिक समरसता आणि राष्ट्राची एकता व अखंडता; हाच संघकार्याचा मूलमंत्र आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे असे संघटन आहे, जे विशुद्ध भारत, भारतीयता आणि भारतीयांच्या कल्याणासाठी कार्य करते. राष्ट्रनिर्मिती आणि ‌‘राष्ट्र प्रथम‌’ या तत्त्वांशिवाय तिच्या केंद्रस्थानी इतर कोणताही विचार नाही. या काळात काही कार्यकर्त्यांशी संपर्क आल्यानंतर माझ्या जीवनाला एक नवीन आणि सकारात्मक दिशा मिळाली. ही एक दैवी प्रवृत्ती आहे. कारण, जेव्हा आपण त्यागी आणि निःस्वाथ व्यक्तींशी भेटता, तेव्हा एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनुष्य स्वतः सबळ बनतो आणि भारताला यश व कीतच्या शिखरावर नेण्याच्या मार्गावर प्रवास सुरू करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काही भ्रांती आणि गैरसमज आहेत. परंतु, त्या संघाशी प्रत्यक्ष जोडल्यावरच दूर होतात. संघाशी जोडले गेल्यावर तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते आणि हीच ऊर्जा राष्ट्रनिर्माण व व्यक्तिनिर्माणाच्या कार्याला सार्थकता प्रदान करते.
 
- माजी ले. जनरल विष्णुकांत चतुर्वेदी