Nitesh Rane : स्वीडनमधील मेरीटाईम क्षेत्रात महाराष्ट्राबाबत उत्सुकता; ‘इंडिया मेरिटाइम वीक’निमित्त मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर

    16-Oct-2025   
Total Views |

nitesh rane
 
स्टॉकहोम : (Nitesh Rane) ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरिटाइम वीक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने, राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे स्वीडन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तेथील नामांकित समुद्री तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांसोबत गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि रोजगारनिर्मिती याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.
  
हेही वाचा  : कुंभारवाड्यातील प्रकाशपर्व
 
यावेळी सदर दौऱ्यावेळी अंबर अयाडे, ग्रामीण एन्हान्सर्स समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एफडीआय (ईसीए) चे सदस्य उपस्थित होते. मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी इचान्डीया-Echandia (समुद्री बॅटरी निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी) आणि इनराईड - Einride (आधुनिक पुरवठा साखळी व स्वयंचलित वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्था) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आणि संशोधन सुविधा उभारण्याच्या दृष्टीने या कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली.
 
हे वाचलात का ? : ‘एआय’ भाग्यविधाता!
 
मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या कंपन्यांना महाराष्ट्रात उत्पादन युनिट्स आणि तंत्रज्ञान केंद्रे स्थापन करण्याचे आमंत्रण दिले. तसेच राज्य सरकारच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘ग्रीन इंडस्ट्रीज’ धोरणांतर्गत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. या दौऱ्यातील चर्चांमुळे महाराष्ट्रात नवीन रोजगारनिर्मिती, हरित तंत्रज्ञानातील गुंतवणूक, तसेच आंतरराष्ट्रीय समुद्री सहकार्य यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्वीडनमधील मेरीटाईम क्षेत्रात महाराष्ट्राबाबत प्रचंड उत्सुकता असून, या दौऱ्यामुळे राज्य आणि युरोपीय समुद्री उद्योगांमध्ये नवे सहकार्याचे पूल निर्माण होतील, असा विश्वास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....