मेट्रो ३ : ओळख गती, प्रगती आणि विश्वासाची ! - आकाश भावसार

मेट्रो मुंबईसाठी आणि मुंबईकरांना अत्यावश्यक होती

Total Views |

akash bhavsar powertrain


दिल्लीनेही आपल्या सुरुवातीच्या मेट्रो प्रकल्पांसाठी अशाच विरोधाचा सामना केला होता. पण एकदा नागरिकांनी मेट्रोचे फायदे अनुभवले, तेव्हा मेट्रोला विरोध करणे म्हणजेच राजकीय आत्महत्या करणे असल्याचे सत्य उघड झाले. मुंबईतही तोच काळ आता आला आहे.

आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर विषयावर कंटेंटचे काम करण्यास सुरुवात केली. कारण आम्हाला जाणवलं आपल्या शहरात प्रकल्प खूप असतात पण त्यामागचं सत्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अफवा, चुकीची माहिती आणि राजकारण यांच्या गोंधळात खरी मेहनत, वर्षानुवर्षांची योजना आणि तांत्रिक आव्हाने हरवत जातात. म्हणून आम्ही ठरवलं की, लोकांपर्यंत सत्य पोहोचवायचेच !
जेव्हा मुंबई मेट्रो लाईन ३ विरोधात आंदोलने झाली. त्यावेळी झाडं आणि पर्यावरणाच्या नावाखाली प्रकल्प थांबवण्याचे प्रयत्न झाले. त्यावेळी आम्हाला वाटलं, आता शांत राहणे चुकीचे होईल. आम्ही सोशल मीडियावर, विशेषतः ट्विटरवर, थेट लोकांशी संवाद साधला, गैरसमज दुरुस्त केले आणि या प्रकल्पाचे खरे महत्त्व सांगितले. आज जेव्हा ही मेट्रो सुरू झाली आणि विक्रमी प्रवासीसंख्या मिळाली तेव्हा या शहराने स्वतः उत्तर दिलं ही मेट्रो मुंबईसाठी आणि मुंबईकरांना अत्यावश्यक होती.
दिल्लीनेही आपल्या सुरुवातीच्या मेट्रो प्रकल्पांसाठी अशाच विरोधाचा सामना केला होता. पण एकदा नागरिकांनी मेट्रोचे फायदे अनुभवले, तेव्हा मेट्रोला विरोध करणे म्हणजेच राजकीय आत्महत्या करणे असल्याचे सत्य उघड झाले. मुंबईतही तोच काळ आता आला आहे. विकास थांबवणं म्हणजे लोकांच्या भविष्याला अडवणं! मुंबई वेगाने पुढे जात आहे आणि हीच तिची खरी ओळख आहे गती, प्रगती आणि विश्वास !
- आकाश भावसार,
@PowerTrain_YT

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.