हे सगळे गोंधळलेले.., महाभाग; मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार निशाणा

    15-Oct-2025   
Total Views |
CM Devendra Fadnavis
 
 
मुंबई : (Local Body Elections) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने आता सर्वच विरोधक एकत्र येत आहे. काल ((दि.०९ ऑक्टोबर) महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षाची भूमीका मांडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावरुन आता मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सोलापूर-मुंबई विमान सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सोलापूर येथे आज (दि.१० ऑक्टोबर) करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत होते.
 
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
 
इतके कनफ्युज विरोधक मी माझ्या आयुष्यात बघितलेले नाही. इतके मोठमोठे लोक त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे?, कायदा काय आहे? या सगळ्या गोष्टी माहीत आहे की नाही, मला माहीती नाही. पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहीती आहे. केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हरलो, तर आधीच परसेप्शन करण्याकरता ते करतायत. कारण काल ते राज्यामध्ये जे निवडणुक निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते. चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं (Local Body Elections) काहीच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे. त्यातून सॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे. ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहेत. त्याच्यावर पुर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे. तो राज्य सरकारचा देखील नाही. आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले. यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की, काल आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमरेंना. मग काल त्यांच्याशी चर्चा करुन काहीतरी थातूमातूर सांगितलं. म्हणाले... हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलावणार आहे. आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही. कारण हे दोघेही वेगळे आहेत. ह्या दोन वेगळ्या सॅट्युटरी बॉडीज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन (Local Body Elections) हे ते इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कंडक्ट करतं. आता आज त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही. मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी. जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे. स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करत. सगळे अधिकारी त्यांना आहे. वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा, विधानसभेची वोटरलिस्ट आहे. ती पहिल्यांदा अडोप्ट करतात. आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात. त्याच्यावर अॅडिशन डिलीशनची संधी देतात. या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील, तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत. त्याच्यामध्ये अॅडिशन डिलीशनची केलं पाहिजे. हे काही करायचं नाही, कायदा समजून घ्यायचा नाही. आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करताय.
  
वोटर लिस्टमध्ये सुधारणा करायच्या असतील, तर आमचा पाठींबा
 
आज मी कार्यक्रमात होतो. पण मी असं ऐकलंय की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय. व आमचीही सर्व सहकार्य करण्याची तयारी आहे. इलेक्श चांगले झाले पाहिजे. वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील, तर आमचा पुर्ण पाठींबा आहे. (Local Body Elections) आमचं काही त्याला ना नाही. आणि वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे, ते आज आहेत का? गेले १०-२० वर्ष आहेत ती नाव. आम्ही अनेक वेळा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतले आहे, डुप्लिकेट नाव आहेत म्हणून. काहीतरी कुठलं तरी काढुन हे कसं अन् ते कसं? तुम्ही इतके वर्ष सत्तेत होतात, तेव्हाही ते तेच होतं. काही वेगळं नव्हतं. मला असं वाटतं, पराभव स्वीकारावा, जनतेत जावं, पुन्हा निवडणुकीला उभं रहावं. पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही. संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही. केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे. आणि म्हणून या दोन दिवसांच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे, फियास्को. त्यांना कल्पना देखील नाही, की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे.
मला असं वाटतं, या सगळ्यांत ज्यांना समजत ते पवार साहेब आहेत. कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत.

कोणीही कोणाही सोबत गेलं, तरी महायुतीच निवडून येणार
 
एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणालाही कुठेही जाता येईल. कोणी कोणाचे धरले, बांधले नाहीत. पण तुम्हाला एक सांगतो, कोणीही कोणाही सोबत गेलं, तरीही महायुतीच निवडून येणार. महायुती भक्कम आहे. महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी आहे.
हा आम्हालाही माहिती आहे, की आम्ही निवडून (Local Body Elections) आल्यानंतर पुन्हा हे आताचे फोटो दाखवून बघा आम्ही सांगितलं होतं, बघा आम्ही सांगितलं होतं. वोटरलिस्टमध्ये गडबडी... गडबडी... गडबडी... हे करणार आहे. रडण्याची सवय आहे, पण काही हरकत नाही. असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवास म्हणाले.
 

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.