डोंबिवली : काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते यांनी संघा बाबत वादग्रस्त विधान कल्याण मधील डीसीपी ऑफिसच्या बाहेर केले. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच विधानामुळे आता भाजपा पुन्हा आक्रमक झाली आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी मामा पगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मामा पगारे हे ऍक्टर आहेत असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
तसेच माळी यांनी मामा पगारे यांच्यावर टीका करतांना सांगितले की, मामा पगारे हा रडका माणूस आहे. यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून रडण्याचे काम करत असून आम्ही अशा रडक्यांना भाव देत नाही. संघावर वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावे. तर आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यापुढे गुन्हेगार म्हणून उल्लेख केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील माळी यांनी दिला आहे.