मुंबई : आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते बुधवार, १ ऑक्टोबर रोजी कांदिवली पूर्व विधानसभेतील 'ब्लिस कंपाउंड' मालाड पूर्व येथील डीपी रोडचे उदघाटन करण्यात आले.
आ. अतुल भातखळकर म्हणाले की, "गेल्या १०-१२ वर्षात मालाड पूर्व येथे विविध विकास कामे हाती घेण्यात आली. अनेक डीपी रोडवर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे असून अशा अनेक समस्या दूर करून लोकांच्या यातायातीसाठी आपण डीपी रोड साकारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ पासून देशभरात अनेक विकास प्रकल्प आणि जनहिताच्या योजना राबवण्यात आल्या. प्रत्येक योजना आज थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात मेट्रोचे जाळे विणण्यात आले. नागरिकांच्या मागणीची दखल घेत डीपी रोडच्या समस्येचे निरसन करून आज उदघाटन करण्यात आले आहे. नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सोयीसाठी डीपी रोडची ही भेट देण्यात आली आहे," असे त्यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....