मुंबई : खरवंडी येथील श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टला वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स' वर याबद्दलची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी येथील वनविभागाची ४ हेक्टर जागा भक्तगणाच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने माझ्याकडे केली होती. त्याचा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन अखेर आज त्याला यश आले."
"केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने त्याची अधिसूचना प्रसिद्ध केली. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांचे मनापासून आभार मानतो. श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि उद्याच्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना मला अतिशय आनंद होतो आहे," असे ते म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....