महाकुंभात भामट्यांचा सुळसुळाट; यूपी पोलिसांकडून भाविकांना सतर्कतेचा इशारा

    07-Jan-2025
Total Views | 41

Mahakumbh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Cyber frauds during Maha Kumbh ) 
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे दि. १३ जानेवारी पासून महाकुंभाला सुरुवात होत आहे. महाकुंभासाठी देव-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्थानिक हॉटेल्स तसेच अन्य सुविधांसाठी येथे मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. असे असतानाच अनेक भामटे फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट वेबसाईट आणि जाहिरातींच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचा प्रकार नुकताच उत्तर प्रदेश पोलिसांनी उघडकीस आणला. त्यामुले पोलिसांनी जनतेला जागृत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

महाकुंभादरम्यान हॉटेलच्या नावावर लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी यूपी पोलिसांनी डिजिटल पद्धतीचा अवलंब केला आहे. यूपी पोलिसांनी एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. ज्यामध्ये महाकुंभासाठी हॉटेल कसे बुक करावे आणि फसवणूक करणाऱ्यांपासून कसे दूर राहावे, याबाबत सांगितले आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेते संजय मिश्राही आहेत. हॉटेल बुक करण्याच्या नावाखाली एक कुटुंब कसे फसवणुकीचे बळी ठरते, ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली फसवणूक करणारे त्यांच्याकडून कसे पैसे घेतात आणि गायब होतात हे या शॉर्टफिल्ममधून दाखवण्यात आले आहे.


थोडक्यात सांगायचे तर आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात याद्वारे इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकार 'महाकुंभ २०२५'चे डिजिटल महाकुंभ म्हणून आयोजन करत आहे. महाकुंभाची सर्व माहिती आणि सुविधा एकाच ठिकाणी मिळतील याची खात्री करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 'kumbh.gov.in' ही वेबसाइट तयार केली आहे. महाकुंभाच्या माहितीसोबतच हॉटेल किंवा कॉटेज बुकिंगचे पर्यायही या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121