महाराष्ट्रात राहून सुप्रिया सुळेंकडून राज्याची बदनामी! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
29-Jan-2025
Total Views |
मुंबई : महाराष्ट्रात राहून सुप्रिया सुळेंनी राज्याची बदनामी करू नये, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, २९ जानेवारी रोजी केली.
नीती आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे अडीच ते तीन वर्षात राज्याची आर्थिक आणि सामाजिक परीस्थिती अडचणीत आलेली असून देशात राज्याचा क्रमांक खाली जात आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "सुप्रिया सुळेंनी अभ्यास करावा. इतर राज्यांशी बरोबरी करून आपल्या राज्याची बदनामी करू नये. महाराष्ट्रात राहून राज्याची बदनामी करणे योग्य नाही. महाराष्ट्राचा आणि इतर राज्याचा विकास त्यांनी बघायला हवा. त्या महाराष्ट्रात फिरतात. महाराष्ट्र किती समोर जातोय हे त्यांना कळते."
मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या काळात किती राजीनामे झाले आणि त्यांचे किती मंत्री डॅमेज होते हे सुप्रियाताईंना माहिती आहे. त्यामुळे काही दिवस त्यांनी स्वस्थ बसायला हवे. नवीन सरकार आहे त्यांचे काम बघायला हवे. पुढे चांगले काम होईल. संजय राऊतांना एक दिवस गडचिरोलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कार्याबद्दल कौतूक करण्यासाठी जाग आली. त्यांनी सामनामधून त्यांचे कौतूक केले. त्यामुळे काही दिवसांनी सुप्रियाताई सुद्धा सरकारचे कौतूक करतील. त्यांनी काही दिवस वाट बघावी," असेही ते म्हणाले.