दोन्ही पवार एकत्र! संजय राऊतांचा तीळपापड! म्हणाले, "आता म्हणतील..."
23-Jan-2025
Total Views |
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र, यामुळे खासदार संजय राऊतांना पोटशुळ उठला असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. याप्रसंगी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले. तसेच त्या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचीही माहिती आहे.
यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शरद पवार आणि अजित पवार हे सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक संस्थांमध्ये एकत्र आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थेच्या कामासंदर्भात आम्ही भेटलो असे उत्तर ते देतील. पण आमचे लक्ष आहे," असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे संजय राऊतांचा तीळपापड होतोय का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.