आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बांगलादेशी दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

    22-Jan-2025
Total Views |
 
 

Bangladeshi terrorist 
 
दिसपुर : इस्लामिक कट्टरवादी असलेल्या बांगलादेशातील दहशतवाद्यांना (Bangladeshi terrorist) आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बांगलादेशास लागून असलेल्या धुबरी जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. या अटकेमुळे एकूण अटकेची संख्या आता १४ वर गेली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती मंगळवारी दिली. ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याचे नाव हे अजिबर रहमान असून वय वर्षे ३१ आहे. ही अटक दि : १९ जानेवारी २०२५ रोजी घडली होती.
 
संबंधित दहशतवादी हा धुबरी जिल्ह्यातील बिलासीपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनामारी ग्रामीण भागातील रहिवासी होता.  अल-कायदा या बांगलादेशस्थित कट्टरपंथी इस्लामिक संघटनेशी संबंधित असलेल्या अन्स्रुल्ला बांगला पथकाच्या आरोपीस पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली होती.
 
सीपीआरओने जापी केलेल्या निवेदनामध्ये सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या कारवाया देशाच्या सुरक्षेसाठी आणि सार्वभौमत्वाला ठेच पोहोचवणारी आहे. दरम्यान अटक करण्यात आलेला रहमान हा चिनामारी जिल्ह्यातील १४ वा अटक करण्यात आलेला आरोपी आहे. अन्सारुल्लाह बांगलाने आपले दहशतवादी भारतात पाठवले होते ज्यांना या संबंधित दहशतवादी पथकात नवीन भरती करायची होती.
 
आसाम राज्यातील जिहादी विचारसरणीला लगाम कशी लावता येईल याकडे आसाम राज्य सरकारचे लक्ष आहे.  राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा याबाबत कठोर निर्णय घेत आहेत. त्यांची या प्रकरणावर लवकरच भूमिका समोर येईल, असे सांगण्यात येत आहे.