दावोसमध्ये कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार एस यांच्याशी मुख्यमंत्र्यांची बैठक!

महाराष्ट्रातील विस्ताराबाबत महत्वपूर्ण चर्चा

    21-Jan-2025
Total Views |
 
Davos
 
दावोस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर असून सोमवारी कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार एस यांच्यासोबत त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा पार पडली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतदेखील उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दावोसमध्ये 'महाराष्ट्र पॅव्हेलियनचे' उद्धाटन!
 
या बैठकीमध्ये महाराष्ट्रात नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे कॉग्निझंटच्या कार्यालयांच्या विस्तारासह मेडिसिटी, स्पोर्टसिटी आणि परदेशी विद्यापीठांसाठी महाराष्ट्राचा गेटवे म्हणून वापर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच फिनटेकसह इतर क्षेत्रांमध्ये विस्तारावर भर देण्यात आला. दरम्यान, कॉग्निझंट महाराष्ट्रात त्यांचा विस्तार करण्यासाठी उत्सुक असल्याचे रवी कुमार एस यांनी नमूद केले.