बांगलादेशात हिंदू महिला कॉन्स्टेबलची हत्या

बांगलादेशात अराजकता कायम

    20-Jan-2025
Total Views |
 
 
Bangladesh
 
ढाका : शेख हसिना यांच्या सत्तेनंतर बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय अत्याचाराचे सत्र सुरू आहे. मोहम्मद युनूस यांचे काही महिन्यांआधी अंतरिम सरकार स्थापन झाले. तेव्हापासून बांगलादेशात अल्पसंख्यांवर आणि ज्यात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आत्याचाराचे सत्र सुरू झाले आहे. अशातच बांगलादेशातील हिंदू महिला पोलीस कॉन्स्टेबलची हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी घडली.
 
महिलेचे नाव तृष्णा बिस्वास असून वय वर्षे २२ आहे. तर दुसऱ्या महिलेचे नाव हे रिया मोनी अख्तर अशी मृत महिलांची नावे आहेत. मिळालेल्या अहवालानुसार, तृष्णा बिस्वास ही पतुआखलीमधील महिला कॉन्स्टेबल होती. तिचा मृतदेह हा एका ठिकाणी लटकवण्यात आला होता.
 
सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला, असे सांगण्यात आले. ते म्हणाले की, तिचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने तिने आत्महत्या केली. कौटुंबिक समस्यामुळे तिच्यावर मानसिक दडपण निर्माण झाले होते. पतुआखाली मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह हा कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
 
पहिल्या घटनेनंतर दुसरी घटना ही बांगलादेशातील पटुआखली सरकारी मुलीच्या महाविद्यालयातील वसतीगृहात घडली आहे. जिथे रिया मोनी अख्तरचा मृतदेह सापडला आहे. तिच्या खोली क्रमांक २०१ मध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. महाविद्यालयामध्ये दुसऱ्या वर्षाच्या पदवीसाठी विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत होती.
 
दरम्यान, या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून या घडलेल्या घटनेच्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, यावेळी प्राथमिक तपासादरम्यान आत्महत्येची शक्यता वर्तवण्यात आली होती.