चिन्मय कृष्ण दास प्रभू यांचा जामीन नाकारल्याने कट्टरपंथी वकिलाने अल्ला हू अकबरच्या दिल्या घोषणा
02-Jan-2025
Total Views |
ढाका : बांगलादेशात सत्तापालटानंतर हिंदूंवरील अन्याय अत्याचार थांबायचे नाव घेत नाहीत. बांगलादेशात सध्या मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आहे. काही दिवसांआधी बांगलादेशातील सरकारने इस्कॉन टेंपलचे साधू चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना चितगाव येथील न्यायालयाने जामीन नाकारला. चिन्मय कृष्ण दास प्रभू हे चितगाव येथील पुंडरिक धामचे प्रमुख आहेत.
चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्या आधी इस्कॉन टेंपलच्या पुजाऱ्यास गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. तो अद्यापही तुरूंगातच आहेत. गुरूवारी चितगावमध्ये मेट्रोपॉलिटन कोर्टाने चिन्मय दास प्रभूचा जामीन नाकारला आहे. त्याचे प्रतिनिधित्व ११ वकिलांच्या पथकाने केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमध्ये न्यायालयाच्या आवारामध्ये उपस्थित असलेल्या मुस्लिम वकिलाने अल्ला हू अकबर आणि देशद्रोही घोषणा दिल्या आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.