'इंडी' आघाडीचं भविष्य अंधारात! 'आप'च्या विरोधात काँग्रेस आक्रमक
15-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सगळ्याच पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात कंबर कसल्याचे बघायाला मिळतं आहे. अशातच आता निवडणुकीच्या प्रचारामुळे एकतेचा बनाव करणाऱ्या इंडी आघाडीची बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासहीत विविध पक्षांनी काँग्रेसने आघाडीचे नेतृत्व सोडावे असा प्रस्ताव घटक पक्षातील नेत्यांच्या समोर ठेवला आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी एका प्रचारसभेत असे म्हटले की राहुल गांधी हे काँग्रेस वाचवण्यासाठी लढत आहेत, पण मी दिल्ली वाचवण्यासाठी लढतो आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या एका नेत्यने केजरीवालांचा उल्लेख फर्जीवाल असा केला होता, ज्यावर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी नाराजी वर्तवली होती.
राहुल गांधी मात्र, या सगळ्या दबावाला न जुमानता, काँग्रेसचे नेतृत्व अबाधित राहिल अशी हेकेखोर भूमिका घेताना दिसून येत आहे. त्याच बरोबर दिल्ली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आम आदमी पक्षावर ताशेरे ओढताना दिसून येतं आहेत. आम आदमी पक्षाच्या अपयशावर हल्ला चाढवत, राहुल गांधी यांनी काँग्रसचे वर्चस्व अबाधित ठेवले आहे. दिल्ली मधील नागरी सुविधांच्या दयनीय अवस्थेवर सडेतोड टीका सुद्धा केली. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनतेला आश्वासन देत ते म्हणाले की मी दिल्ली शहर पॅरीस सारखं करून दाखवेल. केजरीवाल यांच्या या विधानवर सुद्धा राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.