बनावट कागदपत्रांचा आधार घेत हिंदू युवकांना पाडले प्रेमाच्या जाळ्यात, हनीट्रॅपच्या माध्यमातून ३ लाखांचा धनादेश आणि २ लाख रक्कम उकळली
15-Jan-2025
Total Views |
भोपाळ : मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये हनीट्रॅपचे (Honeytrap) प्रकरण समोर आले आहे. ज्यात रानू मन्सूरी नावाच्या महिलेने एका नेत्याला आपल्या जाळ्यात ओढले आहे. याप्रकरणामध्ये महिलेने रोख रक्कम आणि धनादेशाद्वारे वसुली केली आहे. रानू मन्सूरी अशी खरी ओळख लपवत तिने मधु नावाने बनावट कागदपत्रे बनवत हिंदू तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. याप्रकरणात सोमवारी १३ जानेवारी २०२५ रोजी रानू मन्सूरीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
शाजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ रोजी शाजापूरमध्ये शरद यांना कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पीडितेने सांगितले की २५ डिसेंबर २०२४ पासून रानू मन्सूरी ही महिला त्याला महत्वाच्या कामासाठी फोनद्वारे संपर्क करत होती. रानू मन्सूरी या महिलेने केलेल्या संपर्कामुळे तो ४ जानेवारी २०२५ रोजी तिच्याकडे पोहोचला होता. त्यावेळी महिलेने युवकाला पुष्पगुच्छ देत त्याच्यासोबत जवळीक होण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमध्ये महिलेने मादक पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली.
तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून एक पथक तयार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी रानू मन्सूरीला अटक केली होती. यावेळी त्याच्याकडून बनावट कागदपत्रेही सापडली असल्याची माहिती समोर आली आहे. कागदपत्रांवर मधु अग्रवाल असे नाव होते. पत्ता हा इंदौरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
या चौकशीदरम्यान सांगितले गेले की, हे काम सुल्तानपूर बर्छामधील रहिवासी इंदर गुर्जरसोबत करत आहे. त्याचा साथीदार इंदर गुर्जर नेहमी कोणाला तरी या ट्रॅपमध्ये अडकवत असे. यानंतर रानू मन्सूरी अशा अनेक लोकांना आपल्या खोट्या प्रेमाच्या मोहात पाडून गैरफायदा घेत होती. यातपासादरम्यान पोलिसांनी रानू मन्सूरीकडून तब्बल २ लाख रोख रक्कम, ३ लाख रूपयांचा धनादेश, ९ मोबाईल फोन आणि एक छुपा कॅमेरा जप्त केला.