संभलमधील दंगलीत बेदखल झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ४६ वर्षानंतर अखेर न्याय
प्रशासनाने १० चौरस फूट जमिनीच्या जागेचा दिला ताबा
15-Jan-2025
Total Views |
लखनऊ : संभलमधील १९७८ च्या दंगलीमध्ये बेदखल झालेल्या तुळशीराम यांच्या कुटुंबाला तब्बल ४६ वर्षानंतर न्याय मिळाला आहे. संभल प्रशासनाने मंगळवारी १४ जानेवारी २०२५ रोजी तुलसीराम यांच्या कुटुंबाला १० हजार चौरस फूट जमिनीचा ताबा दिला आहे. दंगलीमध्ये तुळशीरामची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या कुटुंबालाही दंगलीसारख्या तणावजन्य परिस्थितीत पळून जावे लागले होते.
वृत्तानुसार मिळालेली माहिती, संभल एसडीएम वंदना मिश्रा आणि एएसपी श्रीश चंद्र यांनी मंगळवारी जमिनीची वास्तविक स्थिती निश्चित केली. १५ हजार चौरस फूट जमिनीपैकी १० हजार चौरस फूट जमीन तुळशीराम यांच्या कुटुंबाची असल्याचे तापासातून सांगण्यात आले. घटनास्थळी कारवाई करत प्रशासनाने तळशीराम यांचे नातू अमरीश कुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांना जमिनीचा ताबा दिला.
या प्रकरणामध्ये जन्नत निशा शाळेचे संचालक डॉ. मोहम्मद शाहवेज यांनी दावा केला की, त्यांचे वडील डॉ.जुबेर यांनी संबंधित जमीन ही दंगलीच्या आधीच खरेदी केली होती. यानंतर सरकारने कागदपत्रांची मागणी केली असता, ते कागदपत्रांची पुर्तता करू शकले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी तपास केला असता, जमिनीच्या नोंदीमध्ये तर्क नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यात काही भागांवर अग्निशमन दलाने जागा व्यापली आहे. तसेच कागदपत्रांमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आला आहे.
पुढे तुळशीराम यांचा नातू म्हणाला की, प्रशासनाने आम्हाला न्याय मिळवून दिला आहे. माझ्या आजोबांचा दंगलीत झालेल्या मृत्यूचा फायदा घेत आमची जमीन हिसकावून घेतली होती. आम्ही त्यानंतर पुन्हा याप्रकरणात लक्ष घातले असता, ही जमीन आमची नसल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रशासनाने आम्हाला न्याय दिला असल्याचे अमरीश कुमार म्हणाला.
याप्रकरणामध्ये तुळशीराम यांच्या पत्नी आशा देवी म्हणाल्या की, आम्ही आमच्या जमिनीसह आमचे मंदिर गमावले होते. दंगलीनंतर आम्हाला आमच्या प्रियजनांच्या मृत्यूचे दु:ख तर सहन करावे लागेलच. आमची ओळख गमावली होती. तसेच संबंलमधील अशा अनेक जमिनी या दंगलीदरम्यान ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्या संभलच्या प्रमुख भागामध्ये आहेत. आता प्रशासनाच्या या पावलावर परिसरातील बेकायदेशीररित्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई म्हणून पाहिले जातेय.
जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेमध्ये संभल दंगलीचा उल्लेख केला होता. तेव्हा पीडित कुटुंबीयांनी प्रशासनाला तक्रार पत्र दिले आणि जमिनीवर मालकी हक्क मिळवून देण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर प्रशासन सक्रिय झाले आणि ४६ वर्षानंतर या कुटुंबांना १० हजार चौरस फूट जमिनीचा ताबा मिळाल आहे.