आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पाहू न दिल्याने पतीकडून पत्नीवर गोळीबार
14-Jan-2025
Total Views |
कोलकाता : प. बंगालमधील नैहाटी, उत्तर २४ परगणामध्ये रविवारी १२ जानेवारी २०२५ रोजी रात्री एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर तीन गोळ्या झाडत तिची हत्या केली. चित्रपट पाहण्यावरून नराधम्याने केलेले हे कृत्य क्रूर असल्याचे दिसून आले आहे. आरोपीचे नाव हे महेंद्र प्रताप असे आहे. त्याने आपल्या ३० वर्षीय पत्नीवर गोळीबार करत हत्या केली. पत्नीचे नाव चंद्ररेखा असे असून तिच्या छातीवर गोळीबार करण्यात आला असल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. त्यांना तत्काळ एका शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
तपासादरम्यान, पीडितेची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. एका वृत्तनुसार, रिअल इस्टेट एजंट पती महेंद्रने पत्नी चंद्रलेखाला त्याच्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पाहण्याचा आग्रह केला होता. इच्छा नसतानाही पत्नी चंद्रलेखा आपल्या पतीसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. त्याचवेळी सिनेमागृहातच त्या दोघांचा वाद सुरू झाला होता. मध्यांतरादरम्यान, चंद्रलेखा चित्रपट सोडून घरी परतली. सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पती महेंद्र घरी परतला. दरम्यान, दोघांमध्ये पुन्हा वादंग उठले. त्याच वादात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पतीने आपल्या पत्नीवर गोळीबार केला.
याच प्रकरणामध्ये साफ सफाई करत असताना चुकून गोळी लागली असल्याचा दावा महेंद्र यांनी केला होता. तसेच चंद्रलेखा हिचे काका बबलू घोष यांनी या कृत्याला अपघात असल्याचे सांगितले. याप्रकरणात आता पोलिसांनी महेंद्रला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस मात्र आता चंद्रलेखाच्या जबानीची वाट पाहू लागले आहेत.