Z-Morh Tunnel :गेमचेंजर सोनमार्ग बोगद्याचे मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन!

    13-Jan-2025
Total Views | 88

z morg

श्रीनगर (Z-Morh Tunnel) : कलम ३७० रद्द केल्यानंतर, काश्मीरमध्ये विकासकामांना गती मिळाली आहे. अशातच आता सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान यावेळी काश्मीरच्या जनतेला संबोधित करणार आहे. या कार्यक्रमासाठी जम्मू काश्मीरचे पोलीस, निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. झेड-मोर बोगदा हा काश्मीरसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

मे २०१५ रोजी सोनामार्ग बोगद्याचा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पसाठी एकूण २४०० कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. या बोगद्यामुळे लदाखचे दुर्गम भाग मुख्य प्रवाहांशी जोडले जाणार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. एकूण ८,६५० फूट उंचीवर बांधलेला हा बोगदा तब्बल १२ किलोमीटर लांबीचा आहे. सदर बोगद्यामध्ये आपत्कालीन परिस्थीतीमध्ये बाहेर निघण्यासाठी ७.५ मीटर रूंदीचा पर्यायी मार्ग सुद्धा तयार केला आहे. लडाखचा प्रदेश भारतासाठी धोरणात्मक दृष्टया अत्यंत महत्वाचा आहे. लेह आणि लडाख या भागांना जोडताना हिमस्खलन आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागतं. त्यावर मात करत झेड-मोर बोगदा दळणवळणाचं महत्वाचं साधन बनेल यात शंकाच नाही.

बर्फवृष्टी होत असताना, सोनामार्गचा रस्ता हा वाहतूकीसाठी बंद असायचा. हिमस्खलनामुळे बोगद्याचे बांधकाम पूर्ण होईल की नाही यावर सुद्धा शंका व्यक्त केली जात होती. परंतु अखेर या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले. सोनामार्ग बोगद्यामुळे पर्यटनाला सुद्धा वाव मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121