इमारतीच्या छतावर आढळले गोमातेचे कापलेले शीर

    13-Jan-2025
Total Views |
 
गोमाता
 
रायपुर : छत्तीसगडमधील रायगडमध्ये गोमातेचे शीर कापून फेकल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जेल कॉम्प्लेक्सच्या छतावर गायीचे कापलेले शीर सापडले. तसेच गायीच्या शरिराचे अवशेष भोवताली विखुरलेले आढळले आहेत. याप्रकरणाचा तपास आता छत्तीसगड पोलिसांनी सुरू केला आहे.
 
छत्तीसगडमधील रायगडमध्ये गोमातेचे शीर कापून फेकण्यात आले होते. ही घटना रविवारी १२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी घडली. त्यावेळी गोमातेच्या डोक्याशिवाय इतरही अवशेष अस्ताव्यस्त पडले होते. याप्रकरणाची माहिती गोसेवा सदस्यांना देण्यात आली होती. तेव्हा गोसेवकांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली होती.
 
संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. ज्यूट मि पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहन भारद्वाज म्हणाले की, गाईचे डोके कुत्र्याने गच्चीवर आणल्याची शक्यता वर्तवण्यात आली. भारद्वाज म्हणतात की, गाईचा मृत्यू हा ट्रेनच्या धडकेत झाला असावा आणि त्यानंतर कुत्र्यांना तिचे अवशेष सापडले. मात्र, याप्रकरणी सध्या स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही असा दावा केला. याप्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर पुढील माहितीचा सुगावा लागेल, असे त्यांनी सांगितले.