'ATS' ने ३१ बांगलादेशी घुसखोरांना केली अटक

तपसादरम्यान घुसखोरांनी शस्त्रांची तस्करी केल्याचे आले उघडकीस

    13-Jan-2025
Total Views |
 
Bangladeshi
 
चेन्नई : तमिळनाडू राज्यातील कोईम्बतूरच्या दहशतवादी विरोधी पथकाने बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोरांची तपासणी करत असताना ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. एटीएसने तिरूपूर आणि कोईम्बूतर जिल्ह्यातून त्यांना पकडण्यात आले. शिवाय त्रिपुरामध्ये बांगलादेशींकडून होणाऱ्या शस्त्रांची तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच तीन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कोईम्बतूर शहराताली दहशतवादविरोधी पथकाच्या पाच पथकांच्या कारवाईमध्ये बांगलादेशींना अटक करण्यात आली. हे लोक तिरूपूर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये दीर्घकाळ राहून काम करत होते. चौकशीवेळी हे लोक बांगलादेशमार्गे भारतात घुसखोरी करत दाखल झाले. यानंतर त्यांनी बनावट कागदपत्रे बनवल्याचे तपासातून समोर आले आहे.
 
 
 
दरम्यान एटीएसच्या ५ पथकामध्ये प्रत्येकी ४ पोलीस होते. त्यांनी एका रात्रीत कारवाई करत ३१ बांगलादेशींना अटक केली आहे. यानंतर आता त्यांना पल्लडम आणि तिरूपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
 
पोलिसांची कारवाई अशा वेळी झाली आहे जेव्हा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक घुसखोर बांगलादेशात लपून बसले असून तामिळनाडू पोलिसांनी त्यांची चौकशी करावी, असे विधान केले होते.