ढाका : बांगलादेशातील चितगाव शहरातील कदम मुबारग भागात ६ सप्टेंबर रोजी गणेशाची मूर्ती घेऊन जाणाऱ्या हिंदू भाविकांवर कट्टरपंथींनी दगडफेक केल्याची धक्कादाय़क घटना घडली आहे. गणेश चतुर्थीच्या एक दिवसाआधी ही घटना घडली, रिपोर्टनुसार बतरगली धवपारा सर्वजनीन पूजा समितीचे सदस्य कारागीर उत्तम पाल यांच्या कारखान्यातून गणेशाची मूर्ती एका गाडीतून आणत असताना हा प्रकार घडला होता.
यावेळी भाविकांनी आपली गणेशमूर्ती मोमीन रस्त्यावर आणली आणि तिथून त्यांनी मिरवणुकीला सुरूवात केली. यावेळी कट्टरपंथींनी हिंदूंवर गरम पाणी टाकले आणि दगड, विटाफेक केली होती. यावेळी घ़डलेल्या घटनास्थळी एक मशीदही होती. यावेळी झालेला हल्ला एक कट असून जाणूनबुजून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
यावेळी याप्रकरणामुळे कट्टरपंथी आणि हिंदूंमध्ये वादाला तोंड फुटले. या हल्ल्यात हिंदू तरूण जखमी झाले. यावेळी जखमी तरूणाने झालेला प्रकार सांगितला, तो म्हणाला की, एका आणखी हिंदू तरूणाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. निर्वासित शेख हसीनांचा पक्ष अवामी लीगने या हल्ल्य़ाचा निषेध केला आहे. अवमी लीगने पोस्ट केलेल्या व्हिडिओत शेख हसीनांचा अवामी पक्षाने या झालेल्या निषेध केला आहे. अवामी लीगने पोस्ट केलेल्य़ा व्हिडिओत विचारण्यात आले की, "अल्पसंख्यांकांवर हल्ले का होत आहेत?" असा सवाल करण्यात आला होता.
यावेळी प्रत्युत्तरादाखल हिंदूंनी एकत्र येऊन झालेल्या घटनेचा निषेध केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा फौजफाटा, सैन्य तैनात करण्यात आले होते.