दगडूशेठ हलवाईच्या चरणी भाविक लीन, ३५ हजार महिलांनी 'अथर्वशीर्ष' ग्रंथाचा केला जप

    08-Sep-2024
Total Views |
 
Dagadu Sheth Halwai Ganpati
 
पुणे : दगडूशेठ गणपती मंडळात पुणे येथे रविवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जवळपास ३५,००० महिलांनी भगवान गणेश कोषक संस्कृत पठण केले आणि जप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले की, पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिला पहाटेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा ठिकाणी जमल्या आणि त्यांनी अथर्वर्शीर्षचे पठण करून ग्रंथांचा जप करून दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन झाल्या आहेत.
 
दरवर्षी गणेश उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हजारो स्त्रिया अथर्वशीर्ष या संस्कृत ग्रंथाचा जप करतात. पुण्यातील दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाने आणि संस्थेने अथर्वशीर्ष या संस्कृत ग्रंथाचा जप करतात. या पठणाचे ३९ वे वर्ष असल्याचे सांगितले गेले आहे.
 
याचवेळी देशासह पुणे शहराने आपली संस्कृती जपून ढोल-ताशांच्या गजरात शनिवारी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापूजन करत गणपती बाप्पाचे स्वागत केले.